vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम प्रवाश्यांच्या समस्या व तक्रार निराकरणासाठी प्रवासी राजा व कामगार पालक दिनाचे आयोजन

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम प्रवाश्यांच्या समस्या व तक्रार निराकरणासाठी प्रवासी राजा व कामगार पालक दिनाचे आयोजन

बुलढाणा, : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाकडून प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सुचनांचे आगार पातळीवर जलदगतीने निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात दर महिण्याच्या बुधवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत ‘प्रवासी राजा दिन’ व दुपारी 3 ते 5 या वेळेत ‘कामगार पालक दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून प्रवाशी आणि महामंडळाच्या कामगारांनी लाभ घेऊन समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळेत प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये त्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतील. तसेच दुपारी 3 ते सांयकाळी 5 दरम्यान कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटना, कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे किंवा समस्यांचे तत्काळ निराकरण करतील.

 बुलढाणा विभागातील चिखली आगार येथे दि. 29 एप्रिल, खामगाव आगार येथे दि. 6 मे, मेहकर आगार येथे दि. 13 मे, मलकापुर येथे दि. 20 मे, जळगाव जामोद येथे दि. 27 मे व शेगांव आगार येथे दि. 3 जुन रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एसटी बर प्रवाशी व कामगारांनी या सेवेचा लाभ घेवून आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जालना येथे मॅरेथॉन व वॉकाथॉन उत्साहातअहिल्याबाईंचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे” – रावसाहेब पाटील दानवे “नागरिकांचा प्रतिसाद पाहता असे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

🇮🇳 देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध — अफवांवर विश्वास ठेवू नका!

हिंगोली जिल्ह्यातील 180 पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण- राज्यमंत्री मेघना बोर्डिकर

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव..

महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – डॉ.राजेश गवांदे आंतरराष्ट्रीय डिजिटल दंतचिकित्सा काँग्रेस २०२६ अंतर्गत उद्योग गोलमेज परिषद

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून  मोठी  ऐतिहासिक आनंदाची बातमी -भारतीय भूमीवर जन्मलेल्या ‘गामिनी’ने दिला ४ बछड्यांना जन्म 🇮🇳