vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

डिजिटल पद्धतीने होणार जनगणना – २०२७ : प्रक्रिया होणार दोन टप्प्यांत पूर्ण-जिल्ह्यात ३० चार्ज अधिकारी व हजारो प्रगणकांची नियुक्ती विविध ठिकाणी प्रशिक्षणास सुरुवात

डिजिटल पद्धतीने होणार जनगणना – २०२७ : प्रक्रिया होणार दोन टप्प्यांत पूर्ण-जिल्ह्यात ३० चार्ज अधिकारी व हजारो प्रगणकांची नियुक्ती विविध ठिकाणी प्रशिक्षणास सुरुवात

अहिल्यानगर, प्रतिनिधी:- भारतातील जनगणना ही जगातील सर्वात मोठ्या सांख्यिकीय उपक्रमांपैकी एक मानली जाते. १८७२ पासून सुरू झालेली ही परंपरा २०११ पर्यंत अखंडपणे पार पडली असून कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आलेली जनगणना-२०२७ आता नव्या डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत आहे. २०२७ ची ही जनगणना १८७२ नंतरच्या मालिकेतील १६ वी व स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 

जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी व घरगणना करण्यात येणार असून हा टप्पा १ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. यामध्ये १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वयंगणना सुविधा उपलब्ध राहणार आहे, तर १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रगणकांकडून प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना २०२७ मध्ये पार पडणार आहे.

 

जिल्ह्यात जनगणना – २०२७ साठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून एकूण ३० चार्ज अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे ६,८६९ प्रगणक व १,१४५ पर्यवेक्षक अशा एकूण ८,०१४ कर्मचाऱ्यांची, तसेच याव्यतिरिक्त १० टक्के अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना दि. २३ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत प्रशिक्षण दिले जात आहे.

 

या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच डिजिटल माध्यमातून माहिती संकलन करण्यात येणार आहे. नागरिकांना स्वयंगणना करण्यासाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ती १ मे ते १५ मे या कालावधीत खुली राहणार आहे. या पोर्टलवर इंग्रजी, हिंदीसह इतर १४ भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. क्षेत्रीय स्तरावर घरगणना करताना प्रगणकांकडून नागरिकांना सुमारे ३३ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार असून त्यामध्ये घरांची संख्या, घरांचा प्रकार, कुटुंबाची माहिती तसेच सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश असेल.

 

जनगणना-२०२७ ही राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून अचूक व विश्वासार्ह माहिती देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. डिजिटल माध्यमाचा अधिकाधिक वापर करून स्वयंगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशिक्षण सत्रास भेट जनगणना – २०२७ च्या निमित्ताने प्रत्येक तालुकास्तरावरप्रगणकांसाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगणकांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे स्वतः भेट देऊन प्रशिक्षणाची माहिती घेत आहेत. जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची व मूलभूत माहिती देणारी प्रक्रिया असल्याने प्रत्येक प्रगणकाने स्वतःवर सोपवलेली जबाबदारी अत्यंत अचूकपणे व प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.

000000

संबंधित पोस्ट

शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ मध्ये तज्ज्ञांचे मत…

मूलभूत तंत्रशिक्षण व कौशल्य विकासातीलसंधी ओळखून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- शासकीय तंत्रनिकेतन, मिरजमध्ये डिजीटल सुविधा, सौर विद्युत प्रकल्पाचे उद्‌घाटन- डिजीटल सुविधांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील ज्ञान मिळवण्याची सुवर्णसंधी

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख सीईओंशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

तंत्रज्ञानाच्या उपयोगाने प्रशासनात सुलभता आणावी-विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल* विभागीय महसूल परिषदेत विविध महत्वपूर्ण विषयांवर मंथन*

vishwatmaklokswamivarta

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित,जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा..

मेळघाटात 10 मोबाईल टॉवरला मंजुरी*जिल्हा सनियंत्रण समितीची मान्यता