vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

 

      नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची व शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेण्यात येते. या अनुषंगाने नियमितपणे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते.

  याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने एनएमएमटी घणसोली आगारामध्ये सुसज्ज व्यायामशाळा विकसित करण्यात आलेली आहे.

     या नूतन व्यायामशाळेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर श्री. दशरथ भगत, परिवहन समिती सभापती श्री. विकास झंझाड, माजी खासदार, डॉ. संजीव नाईक, परिवहन समिती सदस्य श्री. राजेश राय, श्री. यशपाल ओव्होळ, श्री. अभिजीत पेडणेकर, श्री. रोशन पाटील, श्रीम. शीतल भोईर तसेच परिवहन उपकमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. तुषार दौंडकर, श्री. विवेक अचलकर, श्रीम. दीपिका पाटील, श्री. उमाकांत जंगले, श्री. निवृत्ती सिताप आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     याप्रसंगी महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी एनएमएमटी अधिकारी व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. परिवहन उपक्रमात अहोरात्र कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही अद्ययावत व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल महापौर महोदयांनी प्रशंसा केली. या सुविधेमुळे कर्मचारी वर्गामध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल व कामाच्याच ठिकाणी व्यायामशाळा असल्याने आपल्या व्यस्त कामकाजातून नियमित व्यायामासाठी वेळ देणे अधिक सुलभ होईल असे त्या म्हणाल्या. कर्मचारीवर्गाच्या आरोग्याकरिता परिवहन उपक्रमाने उचललेले हे स्तुत्य पाऊल असल्याचे मत महापौर श्रीम. सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.

0000

संबंधित पोस्ट

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

बदलत्या काळानुरुप पोलीस खाते अद्ययावत, सुविधायुक्त असावे – ना. ॲड आकाश फुंडकर जलंब, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन..

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन उत्साहात

vishwatmaklokswamivarta

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,