vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने घोषित केले.

#राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने घोषित केले.

राज्य प्रतिनिधी-राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने घोषित केले.

महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांकडून राज्यसभेच्या या एका जागेसाठी सदस्याची निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून २०२६ असून, हे अर्ज विधान भवन, मुंबई येथे विहित मुदतीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी ९ जून रोजी दुपारी १२ वाजता विधान भवन येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या जागेसाठी निवडणूक लढविली गेल्यास १८ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिव-२ मेघना तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसचिव मोहन काकडे आणि अवर सचिव सुरेश मोगल हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

00000

संबंधित पोस्ट

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समिती निर्वाचन क्षेत्रामध्ये6, 7 व 9 फेब्रुवारी रोजी मद्य विक्री बंद..

vishwatmaklokswamivarta

निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर एफडीएची धडक कारवाई; ८६ लाखांचा साठा जप्त

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळावर तात्काळ निर्णय घ्या – खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी

vishwatmaklokswamivarta