vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवीकरणीय ऊर्जाधारित शहरी प्रशासनातील उत्कृष्टता पुरस्कारा’ने नवी मुंबईचा राज्यस्तरीय गौरव

‘नवीकरणीय ऊर्जाधारित शहरी प्रशासनातील उत्कृष्टता पुरस्कारा’ने नवी मुंबईचा राज्यस्तरीय गौरव

      नवी मुंबई प्रतिनिधी-    विविध सेवा – सुविधा क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके, पुरस्कारांनी नवी मुंबई महानगरपालिकेचा वेळोवेळी गौरव झालेला असून नुकताच ऊर्जा क्षेत्रातील विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेने ऊर्जा क्षेत्रात शाश्वत शहरी विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सोलर क्वार्टर’ या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र ऊर्जा एक्स्पो पुरस्कार 2026’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस ‘नवीकरणीय ऊर्जाधारित शहरी प्रशासनातील उत्कृष्टता (Excellence in Renewable Energy-Led Urban Governance)’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

          नागपूर येथील संपन्न झालेल्या विशेष समारंभात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (MEDA) प्रादेशिक संचालक श्री.सारंग महाजन यांच्या हस्ते, नवी मुंबई महानगरपालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाडे यांनी हा पुरस्कार उपअभियंता श्री. संतोष मोरास्कर यांच्या उपस्थितीत स्विकारला. या पुरस्काराबद्दल महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड आणि विद्युत विभागाचे अभिनंदन केले आहे.

          या पुरस्कारामुळे राज्यातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाचे महत्त्व अधोरेखित झाले. मागील काही वर्षांत नवी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर स्वच्छ ऊर्जा प्रकल्प राबविण्यासोबतच जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले आहेत.

          या अंतर्गत महानगरपालिकेने २५ सार्वजनिक इमारती व ५० सार्वजनिक सुविधांवर सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे स्थापित केले असून, आणखी काही प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. या प्रकल्पांमुळे दरवर्षी ३.५ लाख युनिट्सपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जानिर्मिती होत असून, साधारणत: १.२ मेगावॅट स्थापित क्षमतेसह ४,५०० MWh पेक्षा अधिक ऊर्जाबचत साध्य करण्यात आलेली आहे.

          तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ५१ हजारहून अधिक सौर व LED आधारित रस्त्यांवरील दिवे बसवून ऊर्जा कार्यक्षमतेत मोठा बदल घडवून आणण्यात आलेला आहे. यामुळे ऊर्जा वापर, देखभाल व दुरुस्ती खर्च आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाली असून नागरिकांच्या सुरक्षेतही वाढ झाली आहे.या उपक्रमांमध्ये नागरिक सहभागावर विशेष भर देण्यात आला असून प्रशिक्षण कार्यशाळा, परिसंवाद आणि पथनाट्य यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिक व भागधारकांना नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा बचत आणि शाश्वत जीवनशैलीबाबत जागरूक करण्यात आलेले आहे.

या पुढील काळात नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांमध्ये मोरबे धरणावरील 100 मेगावॅट फ्लोटिंग सोलर प्रकल्प विशेष वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. सार्वजनिक – खासगी भागीदारीत (PPP) विकसित होणारा हा प्रकल्प पहिल्या टप्प्यात दरवर्षी १३५ दशलक्ष युनिट्स स्वच्छ ऊर्जानिर्मिती करणार असून, यामुळे वीज खर्चात बचत आणि कार्बन उत्सर्जनात घट होईल तसेच देशाच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांनाही हातभार लागेल.

 नवी मुंबई महानगरपालिकेस लाभलेला हा सन्मान महानगरपालिकेच्या ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरण विषयक जागरुकता आणि दूरगामी शाश्वत सुविधा उभारण्याच्या कार्यवाहीला मिळालेली प्रोत्साहनात्मक दाद असून या पुरस्कारामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने नवीकरणीय ऊर्जा आणि शाश्वत शहरी प्रशासनात आघाडीवर असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे. भविष्यात ऊर्जा स्वयंपूर्णता आणि पर्यावरणीय शाश्वतता साध्य करण्यासाठी अधिक वेगाने प्रयत्न सुरू ठेवले जाणार आहेत.

0000

संबंधित पोस्ट

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि जोरदार तीव्र स्वरूपात निदर्शने केले

vishwatmaklokswamivarta

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिच ईश्वर सेवा समजून काम करावे..! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

दिघा परिसरातील उग्र वासाच्या तक्रारीच्या अनुषंगाने मध्यरात्रीच्या गस्तीत केमिकल टँकर जप्त

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक