vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अ त्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’वर यशस्वी उपचार;

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अ

त्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी ‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’वर यशस्वी उपचार;

 

जालना, प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालय आणि नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरत असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश आले आहे. रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच स्तनांच्या कर्करोगाची अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या ऐतिहासिक टप्प्यामुळे जालना जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हा रुग्णालयातील नामवंत ऑन्को-सर्जन (कर्करोग तज्ज्ञ) डॉ. अब्दुल राफे आणि त्यांच्या वैद्यकीय टिमने एका महिला रुग्णावर अत्यंत दुर्मिळ अशा ‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’ साठीची ‘मॉडिफाइड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी’ ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

खासगी रुग्णालयांच्या आर्थिक लुटीतून सुटका!यापूर्वी जालना जिल्ह्यातील सामान्य आणि गरीब रुग्णांना स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर किंवा इतर मोठ्या शहरांमधील खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत असे. यासाठी रुग्णांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र, आता जिल्हा रुग्णालयातच ही प्रगत शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे स्थानिक पातळीवरच गरिबांना मोफत आणि तज्ज्ञ उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रुग्णालयाची पायाभूत सुविधा सक्षमजिल्हा सामान्य रुग्णालयाची पायाभूत सुविधा आणि आमचे मनुष्यबळ कर्करोगासारख्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया हाताळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, हे या यशाने अधोरेखित केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मी डॉ. अब्दुल राफे, भूलतज्ज्ञ, शस्त्रक्रिया गृह कर्मचारी आणि परिचारिकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. सर्वसामान्य जनतेला अशाच सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही निरंतर कटिबद्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

कुष्ठरुग्ण शोध अभियानात 53 नवीन रुग्णांची नोंद

vishwatmaklokswamivarta

श्री गणेशा आरोग्याचा; उपक्रमात २० हजार जणांची आरोग्य तपासणी..

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी* *राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी*

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान२०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कार्यक्रम आरोग्य शिबिरात २५० डॉक्टरांच्या पथकाद्वारे भाविकांची मोफत तपासणी व उपचार; पहिल्याच दिवशी सुमारे साडेपाच हजार जणांनी घेतला लाभ

vishwatmaklokswamivarta