vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

… आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले कौतुक….

… आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले कौतुक….

ठाणे प्रतिनिधी) : क्षयरोगाचा सामना करत असलेली वय वर्षे 3 ते 16 मधील मुले. त्यांना आनंद मिळावा.. त्यांची इच्छा पूर्ण व्हावी.. तसेच त्या मुलांना हवी असलेली एखादी वस्तू त्यांना मिळाल्यानंतर अर्थात त्यांची ‘विश (Wish)’ पूर्ण झाल्याचा आनंद आज ठाणे महानगरपालिकेत सर्वांना पाहायला मिळाला. निमित्त होते ठाणे महानगरपालिका आणि Make a Wish Foundation यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. हा स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्या महापालिकेच्याआरोग्य विभागाचे व मेक अ विश फाऊंडेशनचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी कौतुक केले.

     ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्‌य विभाग व मेक अ विश फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे अजित पवार गटाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेविका सहर शेख, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे आदी उपस्थित होते.

क्षयरोगाशी झुंज देणाऱ्या समाजातील गरजू आणि आजाराशी लढणाऱ्या 3 ते 16 वर्षे वयोगटातील बालरुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. क्षयरोग हा केवळ शारीरिक आजार नसून तो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबासाठी मानसिक, सामाजिक आणि आर्थिक आव्हान देखील निर्माण करतो. अशा परिस्थ‍ितीत उपचारांसोबत प्रेम, आपुलकी, प्रोत्साहन आणि आनंदाचीही तितकीच गरज असते. या बालकांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करुन त्यांना नव्या आशा, नव्या उमेदीची भेट देत असल्याचे मेक अ विश फाऊंडेशनच्या स्मिता पाटील यांनी नमूद केले. या बालरुग्णांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या वयोमानानुसार आवश्यक असलेल्या वस्तू उदा. सायकल, लॅपटॉप, मोबाईल, स्मार्ट वॉच, क्रिकेट किट आदी साहित्य या मुलांना वाटप करण्यात आले.

आजाराशी सामना करत असणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचे काम ठाणे महानगरपालिका व मेक अ विश फाऊंडेशन करत आहे. मुलांची गरज ओळखून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या वस्तू आज त्यांना उपलब्ध करुन त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण केल्याबद्दल व हा उपक्रम राबविणारे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद पाटील व मेक अ विश फॉउंडेशनच्या स्मिता यांचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी कौतुक केले

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

आमदार श्रीम.चित्रा वाघ यांनी नमुंमपा घणसोली बेघर निवारा केंद्राची पाहणी करीत व्यक्त केले समाधान

vishwatmaklokswamivarta

ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृतीच्या संवर्धनास मदत -आमदार विक्रम काळे• औसा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे दिमाखात उद्घाटन; ग्रंथप्रेमींचा मोठा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

सोशल मिडीयापेक्षा वृत्तपत्रातील बातमींवर जास्त विश्‍वास – अ‍ॅड. आश्‍विनी धन्नावत,मराठा महासंघ व पीसीएम जालनाच्यावतीने जाहीरात प्रतिनिधींचा सन्मान प्रिंट मिडिया डेव्हलपमेंट 2025 चा पुरस्काराने नरेश कोरडे सन्मानित

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिका व पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्राणायाम शिबीरास प्रारंभ०७ फेब्रुवारी पर्यंत राहणार शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भिम पदयात्रेद्वारे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी