सायनप्रतीक्षा नगर येथील डेपो आगार उभ्या असलेल्या दहा एसी बस मध्ये लागली भीषण आग
मुंबई प्रतिनिधी-
सायन प्रतीक्षा नगर बीएसटी बस डेपो व आणिक आगार येथे बस आगारामध्ये उभ्या असलेल्या दहा एसी बस मध्ये अचानकपणे आग लागली सदर घटनेची माहिती मिळताच आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत
प्राप्त माहिती अशी की आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सायन प्रतीक्षा नगर बस डेपो आणि अनेक आगार बस डेपो येथे आरटीओ जवळ असलेल्या डेपोमध्ये उभ्या असलेल्या एसी च्या दहा बस मध्ये भीषण आग लागली दरम्यान बीएसटी अधिकारी कर्मचारी आणि अग्निशामक दलाला सदर सूचना देऊन घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सर्व गाड्यांवरती पाण्याचा मारा करून लागलेल्या भीषण आगीला आटोक्यात आणले आहे सदर आग कशी लागली याची कोणतीही माहिती अद्याप प्रशासनाला आणि अग्निशामक दलाला मिळाली नसून पुढील तपास वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस आणि अग्निशामक विभाग करत आहेत