vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

       नवी मुंबई प्रतिनिधी   नमुंमपा ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मतिमंद, कर्णबधीर, स्वमग्न, अंध, अध्ययन अक्षम आणि बहुविकलांग मुले शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधांचा लाभ घेत असतात. ईटीसी केंद्रामार्फत या विशेष मुलांसाठी शिक्षण व विविध थेअरपीसोबत इतरही अनेक उपक्रम राबवले जातात. या नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विशेष मुलांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

          राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम [RBSK] अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व शाळा अंगणवाडी यांमध्ये शिक्षण घेणा-या सर्व मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून नमुंमपा ईटीसी केंद्रातील विशेष मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये दैनंदिन आरोग्य, हवामानानुसार होणारे आजार या अनुषंगाने मुलांची तपासणी करण्यात आली.

  •           यतपासणीकरिता डॉ. अशोक चव्हाण, डॉ. सुस्मिता व्हटकर, डॉ. रणजीत शिर्के, डॉ. भाग्यश्री भोकरे, डॉ. तेजस्विनी जाधव, डॉ. प्रतिभा मुंडे, डॉ. विजय पाटील, डॉ. निखील केसरे या डॉक्टरांसह इतर आरोग्य समुहाने विशेष मुलांची तपासणी केली व गरजेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन केले.

  • या आरोग्य शिबीरामध्ये कर्णबधिर विभागातील 114, मतिमंद विभागातील 108, बहुविकलांग विभागातील 11 आणि अंध विभागातील 19 तसेच ओपीडी विभागातील 25 अशा एकूण 277 विशेष मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

           महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य तपासणी शिबीर अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांच्या प्रोत्साहनानुसार आयोजित करण्यात आले. ईटीसी केंद्राच्या संचालिका डॉ.अनुराधा बाबर यांनीही या आरोग्य शिबीराच्या सुयोग्य आयोजनामध्ये स्वत: लक्ष दिले. शिबीराच्या आयोजनात केंद्राच्या अधीक्षक आणि मतिमंद विभाग व कर्णबधीर विभाग यांच्या शैक्षणिक व्यवस्थापकांनी विशेष योगदान दिले.

 

संबंधित पोस्ट

2.70 लाखाहून अधिक नागरिकांची आयुष्मान कार्ड निर्मिती – आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन

रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*रस्ते अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार योजना

vishwatmaklokswamivarta

क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप*

थॅलेसेमिया मुक्तीसाठी विवाहपूर्व तपासणी काळाची गरज : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे ​ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ‘थॅलेसेमिया सप्ताह’ कार्यक्रमाचे उद्घाटन व शपथ ग्रहण 

कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबवा – मिन्नू पी.एम.• 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत होणार घरोघरी सर्वेक्षण• समाजात जनजागृती करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चातगाव आरोग्य उपकेंद्राला मध्यरात्री अचानक भेट-रात्रीच्या आरोग्य सेवेची तत्परता, औषधसाठा, मलेरिया निदान किट्स व नोंदींची केली प्रत्यक्ष पडताळणी