vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित, शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमली चार सदस्यीय चौकशी समिती !

*अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित, शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमली चार सदस्यीय चौकशी समिती !

जालना (वार्ताहर ) आपल्या न्याय मागण्यासाठी कै. नानासाहेब वाघ माध्यमिक विद्यालय नजीक पांगरी ता बदनापुर येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयासमोर दि १४ ऑगस्ट ला उपोषण सुरू केले होते उपोषणादरम्यान प्रभारी शिक्षणाधिकारी रवी जोशी , केंद्रप्रमुख गणेश गिराम व त्यांचे शिष्टमंडळ वरिष्ठ सहाय्यक प्रसन्न कुमार जोगदंड, कनिष्ठ लिपिक अनिल भेरे यांनी मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी व उपोषण कर्ते यांच्याशी चर्चा केली. परंतु उपोषणकर्ते आपल्या मागण्यावर ठाम होते.जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार ! अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. उपोषणकर्त्यांनी दि ९ जुलै २०२५ च्या पत्रानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळू खरात यांना आपल्या वर मुख्याध्यापक तथा सचिव प्रल्हाद वाघ यांच्याकडून होणाऱ्या अन्याया विरोधात दाद मागितली होती मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार करून तसेच प्रत्यक्ष भेटीदरम्यान चर्चा केली होती त्याच अनुषंगाने २२ जुलै २०२५ ला माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी बदनापूर यांना पत्र देऊन सदरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा असे कळविले होते. गटशिक्षणाधिकारी बदनापूर यांनी विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांना पत्र देऊन चौकशी करण्याच्या सूचना देत असा खो-खो चा खेळ सुरू ठेवला व चौकशी अधांतरीच राहिली. शेवटी अन्यायग्रस्त शिक्षकांनी उपोषणाचा इशारा देताच जिल्हा परिषद प्रशाला बदनापूर या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख त्यांनी प्रत्यक्ष शाळेवर न जाताच अन्यायग्रस्त शिक्षकांचे जबाब घेतले.१३ऑगस्ट २०२५ ला सुद्धा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी अध्यक्ष सचिव कै. नानासाहेब वाघ शिक्षण प्रसारक मंडळ नाव्हा द्वारा संचलित मुख्याध्यापक कै नानासाहेब वाघ विद्यालय नजीक पांगरी यांना अन्यायग्रस्त शिक्षकांच्या सर्व मागण्या ह्या आपल्या शालेय स्तरावरील असून त्या पूर्ण कराव्यात व त्यांना उपोषणापासून परावृत्त करावे असे कळवले या पत्राला केराची टोपली दाखवत माननीय उपाध्यक्ष यांनी स्वातंत्र्य दिनानंतर आपल्या मागण्या मान्य करण्यात येईल असे अन्यायग्रस्त शिक्षकांना कळवले परंतु उपोषण कर्ते आपल्या न्याय मागण्यावर ठाम होते.मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी व त्यांचे शिष्टमंडळ यांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली तेव्हा शिक्षणाधिकारी यांनी संदर्भीय प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी चार सदस्य समिती नेमली त्यात पथक प्रमुख मनोज कोल्हे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जालना,श्री रवी जोशी प्रभारी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जालना, श्रीमती विनया वडजे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जालना, श्री शिनगारे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अंबड यांना १० दिवसात चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेशित केले त्यामुळे उपोषणकर्त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपोषण तात्पुरते स्थगित केले व सदरील प्रकरणाची चौकशी करून मागण्या मान्य झाल्या नाही आणि अन्याय करणाऱ्या मुख्याध्यापक तथा सचिव यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर उपोषण पूर्ववत सुरू केल्या जाईल असा इशारा देण्यात आला आहे व त्याचप्रमाणे उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने सुद्धा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे उपोषणा दरम्यान मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, सदस्य प्रेमदास राठोड, आर एफ कुरेशी, जिल्हा सचिव संजय येळवंते, कोषाध्यक्ष नारायण मुंडे, मार्गदर्शक डॉ मारुती तेगमपुरे, कार्याध्यक्ष फरकुंद अली सय्यद, उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे, सहसचिव प्रद्युम्न काकड,प्रसिद्धी प्रमुख पटेल,युवा शहराध्यक्ष सोहम बोदवडे, माजी सिनेट सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तथा भगतसिंग शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था संचालक भागवत काकडे, महिला प्रतिनिधी शिरीन बेगम शहा, मन्सूर शेख,रशीद शेख, संजय चव्हाण, गणेश मेहेत्रे,सचिन अंबडकर,राहुल साळवे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी केदार, मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त शिक्षक गौतम बनसोडे, प्रा दत्ता देशमुख, प्रा राज्यक्रांती वलसे यांची विशेष उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी 10 टक्के भाडेवाढ आकारणी…

सारा नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आत्महत्या घटनेची चौकशी सुरू- गृहराज्यमंत्री योगेश कदम

चलो इंडिया’ अनिवासी भारतीयांसाठी जागतिक अभियान.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनःमुख्य शासकीय सोहळा सिद्धार्थ उद्यान येथेबुधवारी (दि.१७);मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ ची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर