vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

*‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्साहात सुरुवात; नागरिकांनी घेतला महसूल सेवांचा लाभ*

*‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्साहात सुरुवात; नागरिकांनी घेतला महसूल सेवांचा लाभ*

 

गडचिरोली, चंद्रपूर प्रतिनिधी: जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महसूल मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आज आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांमधून नागरिकांना महसूल विषयक विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या

सदर शिबिरांमध्ये प्रामुख्याने प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, महसूल अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा, अकृषक (NA) परवानगीबाबत मार्गदर्शन, भूसंपादन प्रकरणातील कागदपत्रांची पूर्तता, ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक नोंदणी, पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शन तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

पोर्ला येथे आयोजित शिबिरास जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रशासन थेट नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचवत असून महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तसेच डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथील शिबिरात बोलताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आदर्शावर आधारित शासन व्यवस्था सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. या शिबिरांमुळे सातबारा फेरफारसारख्या महसूल सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असून पात्र लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात येत आहे. डिजिटल प्रणालीमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढत असून तांत्रिक अडचणींमुळे कोणाचेही काम प्रलंबित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

आज पार पडलेल्या शिबिरांमध्ये पोर्ला (ता. गडचिरोली), खमनचेरू (ता. अहेरी), कुनघाडा रै. (ता. चामोर्शी), लगाममाल (ता. मुलचेरा), शंकरपूर (ता. देसाईगंज), वैरागड (ता. आरमोरी) तसेच कढोली (ता. कुरखेडा) या महसूल मंडळांचा समावेश होता. याशिवाय मसेली (ता. कोरची), बामणी (ता. सिरोंचा), मन्नेराजाराम (ता. भामरागड), मुरुमगाव (ता. धानोरा) व जारावंडी (ता. एटापल्ली) येथेही शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या सर्व ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. नक्षलप्रभावित छत्तीसगड सीमेलगतच्या एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जारावंडी महसूल मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत सुमारे २५० नागरिकांनी नोंदणी करून मोठा प्रतिसाद नोंदविला.

दरम्यान, अभियानाच्या पुढील टप्प्यात १४ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये बाम्हणी (ता. गडचिरोली), पेरमिल्ली (ता. अहेरी), येणापूर (ता. चामोर्शी), देऊळगाव (ता. आरमोरी), मालेवाडा (ता. कुरखेडा), बेळगाव (ता. कोरची), पेंटीपाका (ता. सिरोंचा), ताडगाव (ता. भामरागड), सुरसुंडी (ता. धानोरा) व कोटमी (ता. एटापल्ली) या महसूल मंडळांचा समावेश आहे. त्यानंतरही १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे, १५ मे या नियोजित तारखांना महसूल मंडळनिहाय ठिकठिकाणी या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या महसूल विषयक समस्या थेट प्रशासनासमोर मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

भारताने राष्ट्रीय रेड लिस्ट मूल्यांकन-प्राणी प्रजातींच्या संरक्षण…!

vishwatmaklokswamivarta

श्रीवर्धन येथील मौजे बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

vishwatmaklokswamivarta

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta