vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अमृत’ संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत ‘ड्रोन पायलट’ प्रशिक्षण

अमृत’ संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत ‘ड्रोन पायलट’ प्रशिक्षण

 

            सांगली, प्रतिनिधी: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी) या स्वायत्त संस्थेतर्फे ‘अमृत ड्रोन मिशन’ हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील तरुण-तरुणींसाठी ही एक मोठी संधी ठरणार असल्याचे अमृत संस्थेतर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

       सध्याच्या काळात शेती, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, उद्योग, चित्रीकरण, लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणी दिवसेंदिवस वाढत असून या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘अमृत’ संस्था युवकांना या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे.

        या मोफत प्रशिक्षणामध्ये ड्रोन हाताळणी, सुरक्षा नियम, डिजिटल मॅपिंग, कृषी क्षेत्रातील वापर, हवाई सर्वेक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात येणार आहे. विशेषतः ग्रामीण युवकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांना आत्मनिर्भर आणि रोजगारक्षम बनण्यावर भर दिला जात आहे.

   अधिक माहितीसाठी https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळ पहावे किंवा महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत), होमगार्ड ऑफिस शेजारी, अप्पर तहसीलदार कार्यालया समोर, राजवाडा, सांगली, मनोज मारुती मिरासदार (मोबाईल क्रमांक: 9112228766) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशासनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स 00000

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

मुंबई येथे डिझेल, पेट्रोल व पेट्रोलियमसदृश द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

vishwatmaklokswamivarta

भारतीय डाक विभागाची सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप सुविधा; नागरिकांना घरबसल्या जलद आणि आधुनिक सेवा…

vishwatmaklokswamivarta

अमृतचे पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण शिबीर संपन्न 

सैनिक कल्याण सेवा आता ऑनलाईन;नावनोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta