vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

रायगड डाक विभागात पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी डायरेक्ट एजंट भरती पात्र व्यक्तींनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा 

रायगड डाक विभागात पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी डायरेक्ट एजंट भरती पात्र व्यक्तींनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी:-: भारत सरकारच्या संचार मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या रायगड डाक विभागामार्फत पोस्टल लाईफ इन्शुरन्स (Postal Life Insurance – PLI) साठी डायरेक्ट एजंट नियुक्त करण्यासाठी वॉक-इन मुलाखतीचे सोमवार, दि.10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर, रायगड डाक विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, स्वयंरोजगार करणारे, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट सदस्य तसेच विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व पात्र व्यक्तींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, रायगड डाक विभाग, भारत पगार यांनी केले आहे.

हे पद नियमित वेतनाधारित नसून, कार्य मोबदला (कमिशन) आधारित आहे. देशातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह सरकारी जीवन विमा योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोस्टल लाईफ इन्शुरन्स अंतर्गत कार्य करण्याची ही एक उत्तम संधी असून, समाजसेवेबरोबरच आकर्षक उत्पन्न मिळविण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध होणार आहे. अत्यल्प हप्त्यात उत्कृष्ट विमा संरक्षण, ग्राहकांचा विश्वास, आकर्षक कमिशन व बोनस यामुळे पोस्टल लाईफ इन्शुरन्सची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे.

इच्छुक उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, बारावी अथवा पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. समाजाभिमुख वृत्ती, लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि विमा व्यवसायात काम करण्याची इच्छा असलेल्या महिला व पुरुष उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावेत. निवड झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःच्या नावाने रु.5,000 चे किसान विकास पत्र (KVP) किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) सुरक्षा ठेव म्हणून सादर करणे आवश्यक राहील.

 

000000

संबंधित पोस्ट

उद्योग प्रतिनिधींची बैठक -सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

टाटा सन्स उद्योग समूहानं एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय ..

vishwatmaklokswamivarta

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

उद्योजकतेची नवी पहाट, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी मध्ये बदल*

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा