vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी व चिखलदरा तालुक्यांचाडेल्टा रँकिंगमध्ये राष्ट्रीय-राज्य पातळीवर गौरव राज्यात पटकाविला अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक 

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी व चिखलदरा तालुक्यांचाडेल्टा रँकिंगमध्ये राष्ट्रीय-राज्य पातळीवर गौरव राज्यात पटकाविला अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक

 

      अमरावती, प्रतिनिधी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत निती आयोगाने जाहीर केलेल्या डेल्टा रँकिंग जानेवारी–मार्च २०२६ मध्ये धारणी आणि चिखलदरा तालुक्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्य, झोन व राष्ट्रीय स्तरावर महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. राज्यस्तरावर या तालुक्यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा, तीन राज्यांच्या झोन स्तरावर अनुक्रमे तिसरा व चौथा तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे ३३ व ३६वा क्रमांक पटकाविला आहे.

 

      डेल्टा रँकिंगनुसार या उभय तालुक्यांनी गावांमध्ये आरोग्य आणि पोषण सेवा मजबुत करणे, शैक्षणिक सुधारणा, शेतकरी सहाय्य व कृषी उपक्रम, सामाजिक विकास उपक्रम तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रभावीपणे कार्य केले आहे. डेल्टा रँकिंग नुसार राज्यातील एकूण २७ तालुक्यांमध्ये उत्तम कामगिरी करत धारणी तालुका पहिल्या क्रमांकावर राहिला असून चिखलदरा तालुका दुसऱ्या स्थानावर आहे.

 

       देशपातळीवर आकांक्षित तालुक्याचे विविध झोन तयार करण्यात आले आहेत. यामधील चौथ्या झोनमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यातील ६९ तालुक्यांचा समावेश आहे. झोन स्तरावरही उत्तम कामगिरी करत धारणी तालुका तिसऱ्या क्रमांकावर राहिला असून चिखलदरा तालुका चौथ्या स्थानावर आहे.

 

       देशभरातील एकूण 513 तालुक्यांचा आकांक्षित तालुके कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरही या तालुक्यांची कामगिरी उंचावली असून धारणी तालुका ३३ व्या क्रमांकावर तर चिखलदरा तालुका ३७ व्या स्थानावर आहे.

 

        जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद अमरावती, धारणी व चिखलदरा पंचायत समित्या आणि आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, सामाजिक विकास व मूलभूत सुविधा या संबंधित विभागांतील अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रीय यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नाने ही उत्तम कामगिरी पार पडली आहे.

 

         जिल्हा प्रशासनाने व जिल्हा परिषद अमरावतीने सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्तरीय यंत्रणा व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

स्त्री ही नैसर्गिक शक्तिमान असती तिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यास तिला अधिक लढण्याची बळ मिळते –संजीवनी ताडेगावकरआधार ग्रुपने केला विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे     -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे-सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई § डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा उत्साहात..

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुख दिलीप गाडेकर यांची निवड…

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकार, प्रयत्नांमुळेरायगडच्या रोहा एमआयडीसीत ‘सीट्रिपलआयटी’ मंजूरटाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्ररायगडच्या रोहा एमआयडीसीत १०५ कोटी रुपये खर्चाची सीट्रिपलआयटी’ मंजूर, दरवर्षी हजारो युवकांना प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

संविधान अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम; 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta