vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ प्रवेश वेळापत्रक जाहीर

व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ प्रवेश वेळापत्रक जाहीर

      अमरावती, प्रतिनिधी : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अमरावती कार्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून, https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करणे अनिवार्य आहे

     इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृह योजनेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत सोई –सुविधा पुरविण्यात येतात. जिल्ह्यातील १२ वी नंतर व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी https://hmas.mahait.org संकेत स्थळावर येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कालमर्यादेत मुलांनी इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक एच, राम लक्ष्मण संकुल, दुसरा माळा, रामपुरी कँप अमरावती येथे तर मुलींनी बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक ए, राम लक्ष्मण संकुल, तिसरा माळा, रामपुरी कँप अमरावती या वसतीगृहांमध्ये सादर करावा असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण अमरावतीच्या सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.

   वसतिगृह प्रवेश वर्ष २०२६-२७ साठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. यानुसार ७ ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.१ ते ७ सप्टेंबर या कालावधीत अर्जांची छाननी होईल. पहिली निवड यादी ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल तर पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत १८ सप्टेंबर आहे. रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील निवड यादी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. दुसऱ्या निवड यादितील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे.

   शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या मात्र गुणवत्तेनुसार व वसतिगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारा घेतले जातील असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, (पोलीस आयुक्तालयाच्या मागे) येथे तसेच adobbwoamravati@gmail.com वर ईमेल करता येणार आहे.

 

००००००

संबंधित पोस्ट

जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात’ विदेशी प्रतिनिधींसमोर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत परकीय गुंतवणूक क्षमतेचे सादरीकरण

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे पशुपालकांना ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

बँकांनी विविध महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

लघु उद्योजकांसाठी पुरस्कार; ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta