सेवा संकल्प अभियाना अंतर्गत unicef वात्सल्य प्लस कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- उमेद च्या वतीने कृषीविभागा समवेत उमेद – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती सोयगाव येथे १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेद अभियानातील सर्व कृषी सखी यांची कापूस उत्पादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत कापूस उत्पादन महिला शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले. पोषण आहार,विविध विभागाच्या योजना संदर्भात माहिती देण्यात आली, कापूस शेतात कामाच्या संबंधित जोखीम ,घटक ,प्रतिबंधात्मक उपाय योजना कापूस पिकाची सुधारित लागवड तंत्रज्ञान याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या एकदिवसीय कार्यशाळेला गटविकास अधिकारी यमुलवाड, युनिसेफ चे राज्य सल्लागारडॉ. गोपाल पडगे, कृषी विज्ञान केंद्र गांधीलीचे-डॉ. अनिल रोडे, युनिसेफ राज्य सल्लागारडॉ. दीपक पवार, तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील देशमुख या मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. सोयगाव तालुक्यातील उमेद चे तुषार बरगट ,आणि टीम सर्व कृषी सखी उपस्थित होते.