vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोलीत ९ बालकांवर ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया*

सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोलीत ९ बालकांवर ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया*

गडचिरोली, प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया शिबिरात ९ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (RBSK) आश्रमशाळा तपासणी पथकाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.शाळा व आश्रमशाळांमधील आरोग्य तपासणीदरम्यान आढळलेल्या बालकांना संदर्भसेवेद्वारे निदान व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. आयुषी गुप्ता यांनी या शस्त्रक्रिया केल्या.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी शस्त्रक्रिया कक्षास भेट देऊन पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.शिबिरासाठी शस्त्रक्रिया कक्षाचे प्रभारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

संबंधित पोस्ट

क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप*

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद;जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग

मोहरम सुटीमुळे 26 जूनचे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

श्रीगणेशा आरोग्याचा २०२६जिल्हा कारागृहाला धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे वैद्यकीय उपकरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत आज (दि.१९) समारंभपूर्वक दान; आरोग्य शिबीरही

vishwatmaklokswamivarta

सिकलसेल मुक्तीसाठी १५ जानेवारीपासून विशेष अभियान*७ फेब्रुवारीपर्यंत तपासणी व जनजागृती*

vishwatmaklokswamivarta

एचपीव्ही लस सुरक्षित; अफवांना बळी पडू नका-डॉ. अमोल गीते यांचे आवाहन