vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पाणी परवाना, विद्युत उपसा यंत्र परवाने-31 जानेवारीपर्यंत नूतनीकरण करून घ्यावेत..

पाणी परवाना, विद्युत उपसा यंत्र परवाने-31 जानेवारीपर्यंत नूतनीकरण करून घ्यावेत..

 

– सांगली, प्रतिनिधी: परवाना मुदत संपलेल्या लाभधारकांनी, सहकारी संस्थांनी आपले पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने दि. 31 जानेवारी 2025 अखेर आवश्यक कागदपत्रे सादर करून नूतनीकरण करून घ्यावेत. अन्यथा, असे पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने आपणास आवश्यकता नाही असे समजून शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपोआप रद्द होतील. याबाबत स्वतंत्र कळविले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

  ज्या बागायतदारांचे, ग्राहकांचे पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने मे 2024 अखेर कार्यान्वित झालेले नाहीत, असे पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने दिनांक 21 नोव्हेंबर 2002 च्या शासन निर्णयामधील तरतुदीसार रद्द करण्यात येणार आहेत. याची सांगली पाटबंधारे विभागांतर्गत कृष्णा नदी, मध्यम प्रकल्प व ल. पा. तलावांवर 31 मे 2022 या दिनांकापूर्वी पाणी परवाना व विद्युत उपसा यंत्र परवाना मंजूरी घेणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगांव व जत तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सर्व लाभधारक / बागायतदार / सहकारी पाणी पुरवठा संस्था यांनी नोंद घ्यावी.

  ज्या सहकारी पाणी पुरवठा संस्था यांनी दि. 1 जुलै 2023 ते 30 जून 2029 या कालावधीचा पाणी परवाना पुनर्विलोकन करून क्षेत्र निश्चितीसह करारनामा करून घेतले नाहीत त्या सहकारी संस्थांनी त्वरित आपले संस्थेचे क्षेत्र निश्चित करून करारनामे करून घ्यावेत. अन्यथा ज्या संस्थांनी दि. 1 जुलै 2023 ते 30 जून 2029 या कालावधीत ज्या लाभधारक सभासदांचे न. नं. 7 चे अर्ज भरून दिले आहेत, त्या गट क्रमांकाचे क्षेत्र निश्चित केले जाईल व आपणास उर्वरीत क्षेत्राची आवश्यकता नाही, असे समजून आपला उर्वरीत क्षेत्राचा परवाना आपोआप रद्द होईल. याबाबत कोणाची काही हरकत असल्यास दि. 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली यांच्या कार्यालयास लेखी निवेदन देण्यात यावे. तद्नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी पुढाकार घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्णसंधी

भरडखोल येथे 137.22 कोटीच्या मत्स्यबंदर विकासकामाचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तर खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन संपन्न2 वर्षात विकसित बंदराचे लोकार्पण करणार; मच्छिमार बांधवांची आर्थिक समृद्धी होणार- मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*

रस्ता सुरक्षा संदर्भात जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

सावकारी जाचाने पीडित कर्जदारानी योग्य त्या पूराव्यानिशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे

vishwatmaklokswamivarta

प्रणवी भिसेचे संस्कृत स्पर्धेत यश

vishwatmaklokswamivarta