vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भाजपा सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जालना जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक,मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे अभिनंदन

भाजपा सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जालना जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक,मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे अभिनंदन

जालना (प्रतिनिधी) : – महाराष्ट्र राज्यात भाजप पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियान सुरु आहे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने राष्ट्रीय सदस्यता अभियान अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश कार्यशाळा श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे (दि.०४) आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भाजपा सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत जालना जिल्ह्याचा राज्यामध्ये पाचवा क्रमांक आला असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जालना भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी सांगितले कि, भाजपा नेते तथा माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्व अभियानात सक्रिय सहभागी होत पक्षाच्या सदस्यता संख्या वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत, पुढेही सदस्यता नोंदणी अभियानात जालना जिल्ह्याचा सक्रीय सहभाग राहील असा विश्वास श्री.पठाडे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण, ना.पंकजाताई मुंडे, सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाश जी, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधान परिषेदेचे गटनेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस माधवी नाईक ताई, आ.विक्रांत पाटील, सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस विजय चौधरी, तसेच सर्व सन्माननीय मंत्री, आमदार आणि प्रदेश सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होते.

यावेळी जालना जिल्ह्यातून जालना महानगर अध्यक्ष सतीष जाधव, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, महानगर महामंत्री सुनील पवार यांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरसाठी 254 जादा बसेस…

रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

आज आदरणीय दादांना जाऊन पाच महिने पूर्ण झाले… सुनेत्रा ताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

मद्यपान, तंबाखू आणि धूम्रपानासारख्या कायद्याने आक्षेपार्ह असलेल्या जाहिरातींच्या रेल्वेमधील प्रदर्शनावर बंदी: अश्विनी वैष्णव

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण ९८२ जणांचा विविध पुरस्काराने सन्मान महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

vishwatmaklokswamivarta