vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या पाहणीसाठी येणाऱ्य,कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या पाहणीसाठी येणाऱ्य,कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

 

 नवी मुंबई, द प्रतिनिधी:- राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या पाहणीमध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 ह्या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्य विषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्य विषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, कोकण विभागाचे, सहसंचालक यांनी केलेआहे.

भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दि. 07 जानेवारी 2025 ते 10 जानेवारी 2025या कालावधीमध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती गोळा करणार आहेत.

पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पाहणी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्य विषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे.

सर्वेक्षणा अंतर्गत कुटुंबाची निवड ‘एक वर्ष किंवा एक वर्षा पेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब’ आणि ‘मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती’ यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे. या करिता सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्य विषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, कोकण विभागाचे, सहसंचालक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.00000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम; जिल्ह्यात ४२ पथकांमार्फत होणार तपासणी

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते100 क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

vishwatmaklokswamivarta

सशक्त बालक हीच देशाची खरी संपत्ती;संपूर्ण समाज निरोगी व सशक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ- सुदृढ बालकांसाठी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

जोखीमग्रस्त तालखेड गावात २१३ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी

इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोपाळचावडी येथे सर्व रोग निदान-उपचार शिबिर संपन्न ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद