vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

महाडीबीटी’ ’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, प्रतिनिधी: महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती योजना राबवित असताना विद्यार्थी व महाविद्यालयांना केंद्र शासनाच्या ६० टक्के हिश्याचे वितरण सुलभ पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी महाडीबीटी योजनेच्या छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी, असे निर्देश सामाजिक न्याय, अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.

 सह्याद्री येथील सभागृहात स्कॉलरशिप वेळेत मिळण्यासंदर्भात ही योजना गतिमान करण्यासाठी व अडचणी सोडवण्यासाठी सामाजिक न्याय, अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

 यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहसचिव सो.ना.बागुल, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या सहसचिव चित्रकला सूर्यवंशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, आदिवासी विकास विभागाचे अवर सचिव उदय गवस उपस्थित होतेराज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या स्कॉलरशिपचे वितरण सुलभ पद्धतीने व्हावे यासाठी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील प्रवेश अर्ज महाडीबीटी पोर्टलला लिंक करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या माहितीची वारंवार छाननी करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ लवकर मिळेल.

प्रत्येक महाविद्यालयाने ‘ एक महाविद्यालय एक बँक’ धोरण राबविल्यास फ्रिशीपची रक्कम व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची रक्कम वेळेत देणे शक्य होईल. जात वैधता प्रमाणपत्र इयत्ता ११ वी मधेच देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यास विलंब होणार नाही, असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.0000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी(दि.२५);विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त :राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण;उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे..

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ४० हजार बंगाली नागरिकांना मोठा दिलासा

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे :मोठ्या इमारतीमधील तात्पुरत्या बांधकामाबाबत दक्षता घेणार- उद्योग मंत्री उदय सामंत

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश*