vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :विद्यापीठांचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी समिती नियुक्त- मंत्री चंद्रकांतदादा पाटील..

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :विद्यापीठांचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी समिती नियुक्त- मंत्री चंद्रकांतदादा पाटील..

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील विविध विद्यापीठांकडून उपकेंद्र स्थापन करण्याविषयी प्रस्ताव येत आहेत. या उपकेंद्र स्थापन करण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य विक्रम काळे, भावना गवळी यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा असे सांगून मंत्री श्री पाटील म्हणाले की, सर्वच ठिकाणी उपकेंद्र स्थापन करण्यासाठी मागणी होत आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मध्ये पुढाकार घेवून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्या ठिकाणी उपकेंद्र स्थापन करायचे याचा निर्णय घ्यावा. एक जिल्हा एक विद्यापीठ या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. पूर्वी प्रमाणे आता प्रत्यक्ष जाऊन विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजाची गरज राहिली नसून बऱ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे उपकेंद्राच्या ठिकाणी आता प्रशासकीय कामासोबतच आणखी काही कार्यक्रम राबविण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

शेतकरी हिताला प्राधान्य, 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात!

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’साठी प्रकल्प विकासकांना आवश्यक परवानग्या ऑनलाईन देण्यात याव्यात. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या समस्या जिल्हा, गाव, मंत्रालयस्तरावर सोडवा. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण, कार्यान्वित होण्याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन*

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर

vishwatmaklokswamivarta

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मराठीच्या अभिजात दर्जानंतर विकासकामांना गती– मंत्री उदय सामंत केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता राज्याच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू