vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि चंद्रभागा’ अभियान- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि चंद्रभागा’ अभियान- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई, प्रतिनिधी : पंढरपूर हे दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या पवित्र ठिकाणी असलेली चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त असायला पाहिजे. केंद्र शासनाच्या ‘नमामि गंगा’ या नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात चंद्रभागा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी ‘नमामि चंद्रभागा’ अभियान राबविण्यात येत आहे, असे पर्यावरण वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाबाबत सदस्य अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य समाधान आवताडे, राजू खरे यांनीही सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘नमामी चंद्रभागा’ अभियानांतर्गत 48.25 कोटी किमतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने 34.65 कोटी इतका निधी वितरित केला आहे. या योजनेअंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन व अनुषंगिक कामे प्रगतीपथावर आहेत. चंद्रभागेच्या प्रदूषणाबाबत तक्रार आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. पंढरपूर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.

पंढरपूर शहरातून वाहणाऱ्या चंद्रभागेच्या प्रदूषणाबाबत पंढरपूर शहराचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करण्यात येईल. याबाबत आढावा घेण्यात येईल. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जलसंपदा विभाग या संबंधित विभागांनाही यावेळी आमंत्रित केले जाईल, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

संस्थाबाह्य संगोपनासाठी इच्छुक पालकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६; शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल

परिवर्तनवादी गीते, प्रबोधनात्मक व्याख्यान.. यंदाची भीमजयंती ठरणार विचारांचा महोत्सव! सार्वजनिक जयंती उत्सव समितीची जय्यत तयारी; अध्यक्ष निलेश राऊत यांची माहिती …

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ !पाणी वापराच्या योग्य नियोजनासाठी जनजागृती आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते  अनावरण..

युआयटीच्या पहिल्या बॅचने आपल्या कामगिरीतून संस्थेची नवी ओळख घडवावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बी.टेक. विद्यार्थ्यांचा ‘दीक्षा आरंभ’ उत्साहात; तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित करण्याचे आवाहन*दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना मिळणार उद्योगांचा प्रत्यक्ष अनुभव; विविध कंपन्या व उद्योगांमध्ये करिअरच्या व्यापक संधी*राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये चमकलेल्या मोनिका सानू मडावीचा गौरव; गडचिरोलीत सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारणीला शासनाची मंजुरी*

vishwatmaklokswamivarta