vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत,सांगली जिल्हा राज्यात अव्वल- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत,सांगली जिल्हा राज्यात अव्वल- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली, प्रतिनिधी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातील एकण 538 लाभार्थींच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून, सध्या ही योजना राबवण्यात जिल्हा देशात द्वितीय स्थानी व राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२५-२६ या सहा वर्षासाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाद्वारे लागू केली आहे. या योजनेमध्ये सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांचा विस्तार वाढविणे, नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे व असंघटित उद्योगांना संघटित स्वरूप देणे, या क्षेत्राच्या प्रकल्पांच्या औपचारिकीकरणाला प्रोत्साहन देण्यात येते.

याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन २०२०-२०२१ पासून १२६७ प्रकल्प मंजूर असून लाभार्थींना ३६.३७ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी सन २०२४-२५ यावर्षी एकूण ५३८ लाभार्थ्यांचे प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून रक्कम रुपये १२.६७ कोटी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने बेदाणा प्रक्रिया, अन्नधान्य प्रक्रिया, मसाला उद्योग, बेकरी पदार्थ, पशु खाद्य निर्मिती प्रक्रिया इत्यादी प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेद्वारे सुमारे ३४६५ कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजगार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. कुंभार म्हणाले, सद्यस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातून आजअखेर १२६७ प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून प्रकल्प मंजूर करण्याच्या बाबतीत सांगली जिल्हा देशामध्ये दुसया क्रमांकावर आहे. त्यापैकी सन २०२४-२५ यावर्षी जिल्ह्यास ४७८ लक्षांक असून ५३८ साध्य असून सांगली जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. सांगली जिल्ह्यात १२७२ वैयक्तिक लाभार्थी/ स्वयंसहाय्यता गट लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचवा – राज्यमंत्री योगेश कदम कणकवली मतदारसंघातील विविध विभागांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

अनुदानित खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक;२६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री व साठ्यात आढळली तफावत

vishwatmaklokswamivarta

पावसामुळे सिंचन विहिरी कोसळल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या -विविध मागण्यांचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे केंद्रीय कृषी कृषीआणि किसान कल्याण मंत्र्यांना निवेदन उपतालुकाप्रमुख ठोंबरेंनी दिले दिल्लीला जावून कृषी मंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारी ग्रुपच्या 10 गिगावॅट इंटिग्रेटेड सोलर इंगॉट अँड वेफर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे भूमिपूजन. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित