vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याविरोधात ३ एप्रिलला पत्रकारांचे मुंबईत आंदोलन…

स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याविरोधात ३ एप्रिलला पत्रकारांचे मुंबईत आंदोलन…

 

       मुंबई- प्रतिनिधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी ३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता मुंबईतील पत्रकार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात निदर्शने करून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात मुंबईतील १० प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचा”च्यावतीने दुपारी १ वाजता हे आंदोलन होत असल्याची माहिती पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.

जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पहात आहे. या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसार माध्यमांना सर्वाधिक बसणार आहे. त्यामुळे पत्रकारांनी पुढाकार घेत कायद्याला ठामपणे विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. मुंबईतील दहा प्रमुख पत्रकार संघटनांची एक बैठक नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडली. या बैठकीत पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच स्थापन करून या व्यासपीठाच्या माध्यमातून कायद्याला विरोध करणारी चळवळ सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानुसार मंचाच्यावतीने लवकरच राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पत्रकारांच्या तीव्र भावना त्यांच्याकडे व्यक्त करण्यात येणार आहेत.

    तसेच तुषार खरात आणि राज्यातील अन्य पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याची बाब देखील राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत तुषार खरात व इतर पत्रकारांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. विविध पक्षांच्या प्रमुखांनाही भेटून त्यांनी जनसुरक्षा कायद्यास विरोध करणारी भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती केली जाणार आहे.

   ३ एप्रिलच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यभरही पत्रकार रस्त्यावर उतरतील, त्याची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल, असा इशाराही मंचाच्यावतीने एस.एम.देशमुख, संदीप चव्हाण यांनी दिला आहे.     ३ एप्रिलच्या आंदोलनात मुंबईतील जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे,असे आवाहन मंचाच्यावतीने करण्यात आले आहे.

  पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच,मुंबई मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद,मुंबई प्रेस क्लब,मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ,टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन पुणे, श्रमिक पत्रकार संघ,बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ,मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन,मुंबई हिंदी पत्रकार संघ आदी संघटना सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कला- क्रीडा स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन       

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना आवाहन*सातारा जिल्ह्यात 31 मार्च व 1 एप्रिल या कालावधीत विजेच्या गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता

धारावी विभागातील ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद कटके यांचे आकस्मात दुःखद निधन..

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज !१० लाख भाविकांची मांदियाळी – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना;एनएसएपी पोर्टलवर आधार व्हेरिफिकेशन करा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनलाभार्थ्यांचा लाभ डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार..