vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कोकण विभागातील उपधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी इप्सित, प्रत्यय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर आयोजित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न…

कोकण विभागातील उपधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी इप्सित, प्रत्यय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर आयोजित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न…

ठाणे, प्रतिनिधी:- जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत कोकण विभागातील सर्व उपधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी मंगळवार, दि.15 एप्रिल 2025 रोजी इप्सित (PDE), प्रत्यय (e-QJ Courts v2.0) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान या विषयांवर आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.

उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई अनिल माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सुनील राऊत, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, ठाणे बाबासाहेब रेडेकर, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख मुंबई उपनगर कृष्णात कणसे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, रत्नागिरी सचिन इंगळी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सिंधुदुर्ग सुजित जाधव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, रायगड सुनील इंदलकर आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पालघर नरेंद्र पाटील यांच्यासह कोकण विभागातील सर्व उपाधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी आणि संबंधित परिरक्षण भूमापक निमतानदार आणि अपील विषयक कामकाज करणारे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडील कार्यासन अधिकारी अजय भुंगे, अभिजीत चव्हाण व अभिजीत गुजर यांनी मार्गदर्शन केले तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर शुभम डुंबरे आणि मानसी डुंबरे यांनी तर ई-ऑफिस आणि ई-रेकॉर्ड याबद्दल श्रीमती स्वाती सानप यांनी मार्गदर्शन केले. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी भूमी अभिलेख विभागातील इप्सित आणि प्रत्यय या प्रणालीविषयी सखोल प्रशिक्षण घेतले.

यावेळी बोलताना उपसंचालक, भूमी अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई अनिल माने म्हणाले की, भूमी अभिलेख विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये अत्यंत प्रभावी कार्य करीत असून या नव्या प्रणालीमुळे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे विभाग जनताभिमुख होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नगर भुमापन अधिकारी, ठाणे सिद्धेश्वर घुले यांनी केले.

00000

संबंधित पोस्ट

बारमाही पाणी व्यवस्थापनासाठी झऱ्यांचे पुनरुजीवन, संवर्धन आवश्यक,मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील 

vishwatmaklokswamivarta

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद 

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत 

मुंबईतील वांद्रे येथे अरुणोदय वॉकर असोशियन तर्फे वरिष्ठ नागरिकांना करिता 12 जानेवारीला चालण्याची स्पर्धा…