vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत..

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत..

 

          नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका पदभरतीची जाहीरात क्रमांक आस्था/ 01 / 2025, दिनांक 27/03/2025 रोजी दैनिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.

  महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. 20 मे, 2011 अन्वये जे उमेदवार इ. 10 वी / 12 वी (माध्यमिक / उच्च माध्यमिक परीक्षा ) न होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विदयापीठ, ज्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता प्राप्त आहे, अशा मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणा-या उमेदवारांना लिपीक-टंकलेखक व लेखा लिपीक या पदांकरीता अर्ज करण्यात यावा याकरीता तरतूद करण्यात येत आहे.

सदर तरतुदीच्या अनुषंगाने लिपीक-टंकलेखक व लेखा लिपीक या संवर्गाकरिता तसेच जाहिरातीतील इतर सर्व संवर्गासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 19/05/2025 (वेळ रात्री 11.55) पर्यंत वाढविणेबाबत तरतूद करण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करतनिःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनःशहरात दोन रेस्टॉरन्ट्सवर कारवाई;परवाने निलंबित

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

राहाता तालुक्यात ‘महाराजस्व अभियान शिबिर’ उत्साहात संपन्न,एकाच छताखाली शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ