vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांना पिक कर्ज मदतीसाठी ‘शेतकरी सहाय्यता केंद्र’;30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

शेतकऱ्यांना पिक कर्ज मदतीसाठी ‘शेतकरी सहाय्यता केंद्र’;30 जूनपूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

राज्य प्रतिनिधी -बुलडाणा, : शेतकऱ्यांना कर्ज वितरणास सुलभता तसेच त्यांचे अडचणीचे निराकरण व्हावे, यासाठी सर्व शासकीय, खाजगी बँक व ग्रामीण बँकांनी शेतकरी सहाय्यता केंद्र सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले. तसेच पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जूनपर्यंत करुन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 जिल्ह्यातील कर्जवाटपाचे प्रमाण कमी असून शेतकऱ्यांना कर्ज वितरणास सुलभता व अडचणीचे निराकरण व्हावे यासाठी शेतकरी सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले आहे. शेतकरी सहाय्यता केंद्रामुळे शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज मंजूर होण्यास मदत होणार आहे. पीक कर्ज नुतनीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत पीककर्जाचे नुतनीकरण केल्यास शासनाच्या व्याज सवलत व नव्याने पीक कर्ज तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. पीक कर्जासाठी सिबीलची अट नाही. जिल्ह्यातील कुठलीही बँक सिबीलच्या आधारे पीक कर्ज नाकारत असल्यास संबधित शाख प्रबंधकाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

   शासनाकडून प्राप्त होणारे पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, दुष्काळी अनुदान अशा शासकीय मदतीला होल्ड अथवा रक्कम वळती बँकेने करु नये. तसेच जिल्ह्यातील सर्व बँकाना शासनाच्या योजनेसंदर्भातील दिलेले उद्दिष्टे व प्रलंबित प्रकरणाचे निपटारा मुदतीमध्ये पूर्ण करावे. पीक कर्जाचे प्रकरणे संबंधित बँकानी तातडीने निकाली काढून पीक कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्ह्यामध्ये पीक कर्ज व शासकीय योजनासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास जिल्हा प्रबंधक कौशलेन्द्र कुमार सिंग (7507766004), सहायक अग्रणी जिल्हा प्रबंधक मयूर लोणकर (8600309003) किंवा संबंधित बँक समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा.

> समन्वयकांचे संपर्क क्रमांक याप्रमाणे : बँक ऑफ बडोदाचे समन्वयक के.पी.शर्मा (9687606079), बँक ऑफ इंडिया समन्वयक बधिनाथ घुगे (97630008750), बँक ऑफ महाराष्ट्रचे समन्वयक चेतन वानखडे (9028895224), कॅनरा बँक चे समन्वयक संजय कडवे (9479034498), सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे समन्वयक अमोल तायडे (9890899486), इंडियन बँकचे समन्वयक संदीप काळे (8799953310), इंडियन ओव्हरसीज बँकचे राहूल शेंबेकर (7620762727), पंजाब नॅशनल बँकचे समन्वयक सुयोग नेमाने (9970470086), स्टेट बँक ऑफ इंडियाचे समन्वयक हेमंत (7719979393), युको बँकचे समन्वयक रविराज सातव (8087637477), युनियन बँक ऑफ इंडियाचे समन्वयक रवी चोपडे (6301916040), अक्सीस बँकचे समन्वयक रमेश खेडकर (9730076926), एचडीएफसी बँकचे समन्वयक संकेत (9960896989), आयसीआयसी बँकचे समन्वयक समर चव्हाण (9890513523), आयडीबीआय बँकचे समन्वयक राजेश मंडन (9404825103), व्हीकेजीबीचे समन्वयक अविनाश महाले (9423761196), बीडीसीसीचे समन्वयक डॉ. अशोक खरात (7350732179), इक्विटस स्मॉल फायनान्स बँकचे समन्वयक संदिल धुमाळ (8830538413), बंधन बँकचे समन्वयक मयूर आमोदकर (7044412779), कोकट महिंद्रा बँकचे समन्वयक आकाश पंजानी (9545861516) यांच्याशी संपर्क साधावा.

 

0000000

संबंधित पोस्ट

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

महाराजस्व अभियानातून शासकीय योजना लोकांच्या दारात – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके कोरपना येथे आयोजन ; लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

कन्नड येथे पथदर्शी प्रकल्प; शहरी भागात ड्रोनद्वारे जमिन मोजणी‘नक्शा’साठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्ती लाभार्थी संख्येत वाढीसाठी प्रस्ताव सादर करावा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

vishwatmaklokswamivarta

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta