vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

रायगड प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मुलांमध्ये देशप्रेम जागविणे, त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण व्हावी तसेच त्यांना विविध शस्त्रांबाबत माहिती व त्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिकांमधून स्वयंसेवकांची नेमणूक करावयाची असून स्वेच्छेने काम करण्यास इच्छूक असणाऱ्या माजी सैनिकांनी आपली नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड यांच्याकडे त्वरीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,रायगड ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे

  प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी माजी सैनिकांचे जवळील वा गावातील शाळांमध्ये मुलांना 01 तास प्रशिक्षण द्यावयाचे प्रस्तावित आहे. माजी सैनिक स्वयंसेवक पदावर विना मानधन काम करण्यास इच्छूक असल्यास व असे माजी सैनिक सद्या शासकीय सेवेमध्ये काम करत असल्यास त्यांना प्रशिक्षणाचे दिवशी काम करण्याची मंजूरी त्यांच्या वरीष्ठ कार्यालयाकडून घेण्यात येईल. स्वयंसेवक पदावर काम करण्यास इच्छुक माजी सैनिकांची माहिती संकलित करण्याकरीता गूगल फॉर्म भरण्यासाठी माजी सैनिक ग्रृपवर पाठविण्यात आलेला आहे.

००००००

संबंधित पोस्ट

स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड 

घरकुलाच्या मागणीसाठी दिव्यांगांचा-महानगरपालिकेवर धडक मोर्चा  

महिला व बालकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवा-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे

vishwatmaklokswamivarta

पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे 

नेहरु युवा केंद्रातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकासाठी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta