vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जाफराबाद आगारातून १३ नव्या एस.टी. बस सेवा सुरु- आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण

जाफराबाद आगारातून १३ नव्या एस.टी. बस सेवा सुरु- आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते लोकार्पण

 

जालना,प्रतिनिधी) – जाफराबाद आगारातून एकूण १३ नव्या एस.टी. बससेवा आजपासून सुरु करण्यात आल्या असून त्यांचा लोकार्पण सोहळा पंचायती राज समितीचे अध्यक्ष व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या लोकार्पणात मानव विकास मिशन अंतर्गत ८ नवीन बस तसेच सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी ५ लालपरी बस यांचा समावेश आहे. यावेळी जाफराबादचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, एस.टी. आगारप्रमुख, तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेषतः लोकप्रतिनिधी म्हणून फक्त रिबीन कापून थांबण्याऐवजीया आमदार दानवे यांनी औपचारिकतेपलीकडे जाऊन प्रत्यक्ष बसमध्ये प्रवास करून सामान्य प्रवाशांचा अनुभव घेतला. त्यांनी जाफराबाद ते टेंभुर्णी दरम्यान लालपरी बसने प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी कंडक्टरकडून तिकीटही काढले व कार्यकर्त्यांसह बसमधील प्रवाशांशी संवाद साधला. या प्रसंगाने उपस्थितांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जनतेच्या सोयीसाठी नव्या बससेवा सुरू करण्याबरोबरच, एका लोकप्रतिनिधीने प्रत्यक्ष प्रवास करून आपलेपणाचा दाखला दिला, हे विशेषत्वाने जाणवले.

नेतेपणाच्या आभाळात झेपावलेला नेता, पण पाय जमिनीवर!” हे दृश्य पाहून बसमधील प्रवाशांच्या चेहऱ्यावर कौतुक, प्रेम आणि आपलेपणाची लहर उसळली. तीन वेळा आमदार, आणि प्रथितयश नेते रावसाहेब पाटील दानवे साहेबांचे सुपुत्र असूनही सर्वसामान्यांमध्ये मिसळून हा प्रवास करणं म्हणजे राजकारणात माणुसकीचा स्पर्श काय असतो याचं जगजाहीर उदाहरण ठरलं.

संबंधित पोस्ट

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार- उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत श्रमदान

vishwatmaklokswamivarta

मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे-‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीच्या बैठकीत निर्देश

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्यायामशाळेचे लोकार्पण रुग्णांची देखभाल करतांना स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवा- पालकमंत्री शिरसाट

मुंबई उच्च न्यायलयाचे 48 वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे शपथबद्ध झाले

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात प्रसाद, अन्नदान करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी अन्न सुरक्षाविषयक नियमांचे पालन-Festivals.MahaFDA.in पोर्टलवर प्रसाद व अन्नदानाची माहिती सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta