vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल –  1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल –  1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू

[राज्य प्रतिनिधी: भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल केला आहे. रेल्वेने तात्काळ तिकीटांच्या नियमावतील बदल केले आहेत. आता आधारकार्ड शिवाय आणि ओटीपीशिवाय तुम्ही तिकीट बुक करू शकणार नाहीत. 1 जुलै 2025पासून हा नियम तात्काळ तिकीटाच्या बुकिंगसाठी बंधनकारक असणार आहे. तसंच, अधारकार्डवर आधारित OTPदेखील गरजेचा आहे. म्हणजेच जर तुमचं आधारकार्ड IRCTC अकाउंटला लिंक नसेल तर 1 जुलैपासून तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकत नाही.

रेल्वेने मोठा निर्णय घेत तिकीट बुकिंग प्रणालीत बदल केला आहे. रेल्वेच्या या निर्णयामागे एक मोठे कारण समोर येत आहे. तात्काळ तिकीट बुकिंग करताना दलालांकडून किंवा अनेक बनावट ID बनवून ऑनलाइन तिकीट बुक करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळं रेल्वे बोर्डाने सर्व विभागांसाठी तात्काळ तिकीट बुकिंगाचे आदेश दिले आहेत. इतकंच नव्हे कर, रेल्वेच्या नव्या नियमांनुसार 15 जुलै 2025 पासून आणखी एक नवीन नियम लागू होणार आहे. तत्काळ तिकीट बुक करताना आधार व्हेरिफाय मोबाईल क्रमाकांवर आलेला OTP टाकावा लागणार आहे.

रेल्वेने नियम बदलला म्हणजे काय झालं, समजून घ्या! 1 जुलै 2025पासून IRCTC रेल्वे तिकीट वेबसाइट किंवा अॅपवरुन तेव्हाच तिकीट बूक होऊ शकतील जेव्हा युजर्सचे आयआरसीटीचे अकाउंट आधार कार्डशी लिंक असेल व व्हेरिफाय आसेल.

त्याव्यतिरिक्त 15 जुलै 2025 पासून तिकीट बुक करताना आधार कार्ड व्हेरिफाय केल्यानंतर आलेला OTPदेखील द्यावा लागेल.

एजट्ंससाठीही नियम-बल्क बुकिंगला आळा घालण्यासाठी एजंट्सना प्रारंभिक दिवस तत्काळ तिकिटे, बुकिंग विंडोच्या पहिल्या ३० मिनिटांच्या कालावधीत आरक्षित करता येणार नाहीत. वातानुकूलित श्रेणीसाठी हे निर्बंध सकाळी 10 ते 10.30 पर्यंत व बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत लागू राहतील.

आधार कार्ड कसे लिंक करायचे?- यासाठी प्रथम IRCTC वेबसाइटवर जा आणि लॉगिन करा. – तुमचे वापरकर्तानाव आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.- ‘माझे खाते’ (My Account) वर जा आणि ‘लिंक युवर आधार’ पर्यायावर क्लिक करा.- यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करा. – नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरल्यानंतर, सबमिट करा.

संबंधित पोस्ट

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..!!

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

vishwatmaklokswamivarta

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची कामेगतीने पूर्ण करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले • समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न …

विभागीय महसुल क्रिडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन· महसुल राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी ‘सशक्त’ अभियान

vishwatmaklokswamivarta