vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याहस्ते भूमिपूजन

महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्राच्या अतिथीगृहाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याहस्ते भूमिपूजन

सातारा प्रतिनिधी-महाबळेश्वर येथील विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्रामध्ये गव्हाच्या रोगावर संशोधन सुरु असून आता स्ट्रॉबेरी संदर्भात संशोधनास मान्यता मिळाली आहे. त्याचे देखील काम सुरु आहे. लवकरात लवकर केंद्र अद्ययावत करून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

 कृषिमंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे प्रति कुलपती माणिकराव कोकाटे हे महाबळेश्वर येथील वेण्णालेक नजीक महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारत अतिथीगृह भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

श्री. कोकाटे म्हणाले , महाबळेश्वर येथे संशोधनासाठी येणारे शास्त्रज्ञ, परदेशी पाहुणे व शेतकरी याना राहण्यासाठी उपयोगी होईल. माणिकराव कोकाटे यांनी सध्याच्या जुन्या अतिथिगृहाची पाहणी केली. त्यानंतर नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीची जागा व आराखडा पहिला. यातील बारकावे समजून घेत अभियंत्यांना काही बदल कारण्यासह महाबलेश्वर पर्यटन स्थळास शोभेल असे दर्जेदार काम करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, विद्यापीठ अभियंता डॉ. मिलिंद ढोके गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ. दर्शन कदम, गहू रोग शास्त्रज्ञ डॉ. मनीष सुशीर, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रांत साळी, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्यासह गहू गेरवा संशोधन केंद्रातील कर्मचारी,कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील अधिकारी कर्मचाऱ्यासह मान्यवर उपस्थित होते.

     महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्राच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे अतिथीगृह भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधारणा केंद्र (CIMMYT) मेक्सिको येथील गहू तांबेरा शास्त्रज्ञ रोगावर काम करणारे शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यासाठी उपयोगी येणार असल्याचे गहू गेरवा कवक शास्त्रज्ञ डॉ दर्शन कदम यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

समाजसेवेच्या आदर्शांचा गौरव – अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रम-समाजसेवेच्या आदर्शांची आठवण, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे 

पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद*

vishwatmaklokswamivarta

आयुष मंत्रालयाच्या ‘देश का प्रकृती परीक्षण’अभियानाचे ऐतिहासिक पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स-केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव 1.29 कोटीहून अधिक नागरिकांचे प्रकृती परीक्षण 1 लाख 81 हजार स्वयंसेवकांचे योगदान..

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ; वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा- सभापती प्रा.राम शिंदे• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम आणिविद्यापीठ इमारत १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या बैठकीत सूचना..

बकरी ईदच्या अगोदर गोवंशाचे टॅगींग करावे*जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

डिजिटल जनगणना 2027′ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे