vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत प्रशासनाकडून शेतकरी माहिती संच तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (फार्मर आयडी) तयार केला जात असून, तो नसल्यास शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे..बुलढाणा जिल्ह्यात अग्रीस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी दि. 1डिसेंबर 2024 पासून कॅम्प मोडमध्ये, तसेच 21 जानेवारी 2025 पासून नागरी सुविधा केंद्र व कॅम्प या हायब्रिड पद्धतीने सुरू आहे. या मोहिमेत आजअखेर 3,58,674 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेचे एकूण 4,34,468 लाभार्थी आहेत. त्यापैकी फक्त 2,94,339 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले असून, उर्वरित 1,40,129 शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा, अन्यथा ‘पी.एम. किसान’, ‘पिक विमा’, ‘पिक कर्ज’, ‘पिक अनुदान’ आदी योजनांचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे:आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा / गाव नमुना 8 असर्व संयुक्त व समाईक खातेदारांनी प्रत्येक सहधारकाचा स्वतंत्र फार्मर आयडी तयार करणे आवश्यक आहे. तसेच एकदा फार्मर आयडी तयार झाल्यानंतर वारंवार ई-केवायसीची गरज भासत नाही. यासाठी आपला सातबारा उतारा आधार कार्डाशी लिंक करून नजीकच्या नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन…

पुरवणी मागण्यांचा निधी केंद्रपुरस्कृत विकास योजनांवरखर्च होणार असल्याने राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडेल- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तरआर्थिक शिस्तीचे पालन करीतच राज्याचा अर्थकारभार सुरु राज्यावरील कर्जाचा आणि तिजोरीवरील वित्तीय भार मर्यादेतच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. 

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीत • नवीन पात्रता प्रमाणपत्र प्रक्रिया लवकरच सुरू होणार • गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दैनंदिन 10 टक्के कपात…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta