vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

 

 सांगली, प्रतिनिधी  महसूल सप्माहनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पाणंद, शिवरस्ते अतिक्रमणमुक्त , रूंद करण्याच्या मोहिमेत मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याची माहिती तहसिलदार मिरज डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी दिली.

 महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नव महसूल वर्षाचे निम्मित दि. 1 ते 7 ऑगस्ट कालवधीत नागरिकांना महसुली सेवा देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदशानाखाली मिरज तालुक्यामध्ये सर्व मंडळ स्तरावर “पाणंद/शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करणे/रुंद करणे व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याबाबत अभियान राबविण्यात आले.

 हा कार्यक्रम मंडळ स्तरावरील गावांमध्ये आयोजित करण्यात आला. यामध्ये लिंगनूर, आरग, बेडग, मालगाव, सोनी, कानडवाडी, सलगरे येथील जवळपास 7.5 किमी लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमण मुक्त/खुले करण्यात आले. तसेच हे रस्ते भविष्य काळात सुरक्षित राहतील व प्रवाशांना सावली मिळेल या उद्देशाने रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड देखील करण्यात आली. याचा गावातील रस्त्यालगत असलेल्या सुमारे 750 शेतकऱ्यांना लाभ होणार असून शेतकामासाठी आवश्यक असलेल्या पोच रस्ता उपलब्ध झाला आहे. वर्षानुवर्षे जुने रस्त्याचे वाद सोडविण्यात महसूल विभागाच्या प्रयत्नाला यश आले आहे. याकामी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. पाणंद/शिवरस्ते अतिक्रमण मुक्त करणे/रुंद करणे बाबत कार्यवाही पूर्ण वर्ष सुरु ठेऊन जास्तीत जास्त रस्ते वाहिवाटीखाली आणणार असल्याची माहिती तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी दिली. शेतकऱ्यांनी आपसी संमतीने रस्ते खुले, रुंद करून आपले भविष्ज् करावे – तहसिलदार मिरज

 सद्यस्थितीत शेतजमिनीमध्ये कालानुरूप आपसी वाटप झाल्याने धारण क्षेत्र कमी होऊन एकाच गटात जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. अशावेळी प्रत्येक शेतकऱ्यास त्याच्या जमिनीपर्यंत पोचरस्ता उपलब्ध नसल्यास त्याला मशागत करणे, शेतमाल वाहतूक करण्यामध्ये प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो.यामधूनच रस्ता व वाहिवाटीचे वाद उत्पन्न होऊन तहसिल तसेच दिवाणी न्यायालयात दाखल होणाऱ्या वाद प्रकरणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र संबंधित प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रानजिक असलेल्या शेतकऱ्यास आपसी संमती व सामंजस्यातून वाद सोडवून शिवारातील वहिवाटीचे पाणंद / शिवरस्ते / सरबांधावरील रस्ते अतिक्रमणमुक्त करून वापरात आणल्यास सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे. तसेच वर्षानुवर्षे कोर्टातील वादातून संबंधिताना होणारा मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागणार नाही. त्याकामी “शेत तिथपर्यंत रस्ता” हे तत्व सर्वांनी अंगीकारून खऱ्या अर्थाने शेतीतून आर्थिक प्रगतीची वाट तयार करणे आवश्यक आहे. त्याकामी प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे तहसिलदार मिरज डॉ. अपर्णा मोरे -धुमाळ यांनी सांगितले.

 

00000

संबंधित पोस्ट

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन 

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा,विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र डॉ.सुगत चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

vishwatmaklokswamivarta

सायबर जागरुकता कार्यशाळा संपन्नई-गव्हर्नन्स सेवांची सायबर सुरक्षितता  राखण्यासाठी नेहमी दक्षता बाळगावी-जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सपकाळ

vishwatmaklokswamivarta

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

महिंद्रा अँड महिंद्रा येथे इंटर्नशिप कॅम्प; ५१० जागांसाठी २० मे रोजी मुलाखती