vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लातूर येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी लातूर येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण…

 

लातूर, प्रतिनिधी: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, 11 ऑगस्ट 2025 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11.20 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी 11.45 वाजता ते लातूर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे लातूर जिल्हा विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करतील. दुपारी 12.50 वाजता त्यांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषद येथील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होईल. दुपारी 1.15 वाजता दयानंद महाविद्यालय मैदान येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 2.55 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

****

संबंधित पोस्ट

मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

vishwatmaklokswamivarta

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

vishwatmaklokswamivarta

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न सभागृहात मांडला

मक्काच्या गंजीला आग – शेतकर्‍याचे नुकसान- शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्या – उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे

महाराष्ट्राच्या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्राला नवी दिशा, ₹1,00,000 कोटींची गुंतवणूक आणि 50,000 रोजगारांची संधी-केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीकेसी, मुंबई येथे ‘52 व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’चे वितरण

vishwatmaklokswamivarta

कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण