vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध..

मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध..

सांगली, प्रतिनिधी : भारतीय नागरिक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजीचे 12 वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मिरवणुकांमध्ये व्यक्ती, समुदाय, मंडळ यांच्यामार्फत प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या (Plasma, Laser beam light, Beam light) वापरास प्रतिबंध केला असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, समुदाय, मंडळ यांच्यावर पोलीस विभागाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव व दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) हा सण साजरा केला जाणार आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात मिरवणुका होतात. या मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट्‌सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरून जाणारे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन मिरवणुकीमध्ये जावू शकते व त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले व मिरवणूक पाहण्यास आलेली लहान मुले, वयोवृध्द, जेष्ठ नागरिक, सामान्य नागरिक यांच्या डोळ्यास इजा होवून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी युवक व युवतींनीऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

आंतराष्ट्रीय योग दिन,आबालवृद्धांचा योग सरावात उत्स्फूर्त सहभाग बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामूहिक योगासन.

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा 350 वा शहीदी समागम-जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देण्यात येऊ नये; कायद्यात कडक तरतूद करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी