vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गणेशोत्सवास प्रारंभ होत असून आरती संग्रहातून नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता व पर्यावरणशीलतेचा संदेश…

गणेशोत्सवास प्रारंभ होत असून आरती संग्रहातून नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता व पर्यावरणशीलतेचा संदेश…

 

      नवी मुंबई प्रतिनिधी- 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सवास प्रारंभ होत असून गणेशोत्सव काळात घरोघरी व सार्वजनिक उत्सवांच्या मंडपात सकाळ, संध्याकाळ श्रीगणेशासह इतर देव-देवतांच्या सामुहिक आरत्या म्हटल्या जातात. या आरत्या म्हणणे नागरिकांना सोयीचे व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने दुमड घडी स्वरुपातील आरतीसंग्रह उपलब्ध्‍ करुन देण्यात येत असून या अभिनव आरती संग्रहाचे अनावरण महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुकत श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे आणि इतर विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

या आरतीसंग्रहात एका बाजूला गणपती, शंकर, देवी, विठ्ठल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या आरत्या व घालीन लोटांगण ही प्रार्थना मुद्रीत करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या बाजूला स्वच्छता, कचरा वर्गीकरण, प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, सजावटीत पुनर्वापरयोग्य पर्यावरणपूरक साहित्याचा वापर, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा उपयोग, निर्माल्यापासून खतनिर्मितीवर भर असे विविध संदेश आकर्षक चित्रांसह प्रकाशीत करण्यात आले आहेत.

या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबईकर नागरिकांपर्यत स्वच्छता, पर्यावरणपूरकता व प्लास्टिक मुक्तीचा संदेश व्यापक स्वरुपात घेऊन जात आहे. हे आरतीसंग्रह महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी वितरीत केले जात असून शालेय विदयार्थ्यांमार्फतही घराघरात पोहोचविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे विविध समाज माध्यमांवरुनही आरती संग्रहाचे व्यापक प्रसारण होणार आहे.

 

#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #navimumbaimahanagarpalika #DGIPR #nmmccommissioner #drkailasshinde #kailasshindeias #nmmcsolidwastemanagementdepartment #AartiSangrah #SwachhSurvekshan2025 #SwacchBharatAbhiyan #SwachhataAbhiyan #gharogharitiranga #gharoghariswacchta #SwacchBharatMission #swacchabharat

Swachh Survekshan Maharashtra DGIPR MyGovIndia Urban Development Department Government of Maharashtra Swachh Bharat Mission – Urban Swachh Bharat Mission, India

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; २६९६ कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी

vishwatmaklokswamivarta

युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ गाळप हंगामासाठी सज्ज :समृद्धी साखर कारखान्यात 2025-26 हंगामाचे रोलर पूजन

नांदेडच्या एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले19 अपिलार्थींचे 7 हजार 567 व्दितीय अपील फेटाळले

vishwatmaklokswamivarta