vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून, पात्र दिव्यांग, मागासवर्गीय, शेतकरी, महिला व पशुपालक या सर्व लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

    या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आपले अर्ज ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यंत जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com या लिंकवर ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे.

विभाग निहाय्य योजना🔹 समाज कल्याण विभाग५% दिव्यांग कल्याण सेस अंतर्गत प्रमुख योजना:1.दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे.2.दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन(स्कुटी) खरेदीसाठी अनुदान देणे3.दिव्यांग-दिव्यांग व्यक्तिंना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे.4.दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी शेळीपालन वराहपालन, मत्स व दुग्धव्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे.5.दिव्यांग पालकाच्या मुलीसाठी माझी लेक योजनेअंतर्गंत रु 50000/-मुदतठेव रक्कम ठेवणे.6.उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना विशेष शिष्यवृत्ती देणे.२०% जिल्हा परिषद सेस अंतर्गत प्रमुख योजना:1.इ.5 वी ते 9 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे.2.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ)3.मागासवर्गीय इयत्ता 11वी व 12 वी तील विद्यार्थ्याना MH-CET ENINREEING/JEE//NEET च्या प्रशिक्षणवर्गाची खाजगी संस्थेला दिलेल्या फीची प्रतिपूर्ती करणे.4.मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी/महिला बचत गट यांना लघुउद्योगासाठी अर्थिक सहाय्य देणे.5.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT संगणक / टंकलेखन (मराठी/इंग्रजी) प्रशिक्षण पुर्ण केल्यावर फी प्रतीपुर्ती करणे.6.मागासवर्गीय लाभार्थ्यांना डिस्को जॅकी (D.J.) साहित्य पुरविणे.

🔹 कृषी विभाग1. विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे2. सुधारित कृषि औजारांचा पुरवठा करणे3. पिक संरक्षणाकरीता काटेरी तार/सौर कुंपणासाठी अर्थ सहाय्य करणे4. कृषि क्षेत्रात प्लॅस्टिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.

🔹 महिला व बाल विकास विभाग1.महिलांना साहित्य पुरविणे – घरघंटी / पिको फॉल मशीन / शिलाई मशीन (९०% अनुदान)2.इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल वाटप (१००% लाभ)3.इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण (१००% लाभ)4.विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलां-मुलींचा सत्कार (१००% लाभ)

🔹 पशुसंवर्धन विभाग1.५०% अनुदानावर एक संकरित गाय / म्हैस वाटप योजना2.५०% अनुदानावर (५+१) स्थानिक जातीचा शेळी गट वाटप3.६०% अनुदानाने तबेलाधारकांसाठी रबरी मॅट, कडबाकुट्टी यंत्र, मिल्किंग मशीन पुरवठा योजना

अर्ज पडताळणी वेळापत्रक• तालुका स्तर तपासणी : १ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२५• जिल्हा स्तर तपासणी : ८ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५   अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुलभ ठेवण्यात आली असून, सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही सुवर्णसंधी साधून वेळेत अर्ज करावेत. स्थानिक ग्रामविकास अधिकारी, सरपंच, अंगणवाडी कर्मचारी, शाळा व महाविद्यालयांनी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून अधिकाधिक लाभार्थी या योजनांचा लाभ घेऊ शकतील.

0000000

 

संबंधित पोस्ट

बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

vishwatmaklokswamivarta

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवीन महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे,

माजी सैनिकांसाठी भरती

मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ऑनलाईन गेम्सवर विनियमनासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार- राज्यमंत्री पंकज भोयर

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta