vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

मुंबई, प्रतिनिधी : महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा आणि जनजागृतीसाठी २०१८ पासून ‘पोषण माह’ अभियान राबविण्यात येते. राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत ८ वा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार असून, या अभियानाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभांचे आयोजन १७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

आठव्या ‘राष्ट्रीय पोषण माह’साठी यंदा केंद्र शासनाने “लठ्ठपणा कमी करणे, बालपणाची काळजी व शिक्षण (ECCE) / पोषणही शिक्षणही, अर्भक व बालक आहार पद्धती (IYCF), पुरुष सहभाग, व्होकल फॉर लोकल व स्वावलंबन, एकत्रित कृती व डिजिटायझेशन” या सहा प्रमुख थीम निश्चित केल्या आहेत. बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच नवनियुक्त अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास, नगरविकास, आदिवासी विकास व इतर विभागांच्या समन्वयाने व अभिसरणाच्या माध्यमातून पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रातील एकूण ५५३ बाल विकास प्रकल्पातील एक लाख १० हजार ६२९ केंद्रात राबविण्यात येते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील २५ लाख ८२ हजार ३३० बालके, ३ ते ६ वयोगटातील २४ लाख ७४ हजार ४१७ बालके, ४ लाख ३२ हजार २३४ गरोदर महिला व ४ लाख २३ हजार ७५६ स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत.

महाराष्ट्र राज्याने पोषण अभियानांतर्गत मागील सात वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांमध्ये सातत्याने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे सन २०२४ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. यावर्षी देखील विविध जनजागृती उपक्रम, वेबिनार, दूरदर्शनवरील कार्यक्रम तसेच जन आंदोलन डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करून पोषणयुक्त महाराष्ट्र आणि सुपोषित भारत घडविण्याचा संकल्प आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

वेदांत बंडगर हत्या प्रकरणी कुणाचीही गय नाही, आरोपींना मकोका लावणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

रणजित मोहन यादव यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta

देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल सी.पी. राधाकृष्णन यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

जगाला हेवा वाटावी, अशी समृद्ध परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचा विचार जगभरात पोहचावा, यासाठी राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील- आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta