vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

मुंबई, प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल, दादर येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य स्मारक आणि पुतळ्याच्या कामाचा आढावा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. यावेळी आनंदराज आंबेडकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, समुद्राच्या शेजारी हे भव्य स्मारक साकारत आहे. या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीबाबत शिल्पकार राम सुतार यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचा विचार करण्यात आला असून त्याबाबत संबंधित विभागास अवगत करण्यात आले आहे. पुतळ्याच्या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुतळा विहित वेळेत उभा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त वैचारिक अभिवादन

अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येक विभागाने सकारात्मक योगदान द्यावे – एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न- संयुक्त पथकाने दर महिन्याला तपासणी करावी- कारखान्यांकडून प्रतिज्ञापत्र घेण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेतील वर्ग-३ कर्मचाऱ्यांची ‘सेवाप्रवेशोत्तर परीक्षा’ 4 व 5 जुलै रोजी कोकण विभागीय आयुक्तांचे उमेदवारांना संपर्क साधण्याचे आवाहन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

मोहरम सण शांतता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न