vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती संभाजीनगरात रविवारी भिक्खू करूणानंद थेरो यांचा ऐतिहासिक महाथेरो समारंभ व कठीण चिवरदान धम्मसोहळा

छत्रपती संभाजीनगरात रविवारी भिक्खू करूणानंद थेरो यांचा ऐतिहासिक महाथेरो समारंभ व कठीण चिवरदान धम्मसोहळा

 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रतिनिधी: आपल्या प्रेरणादायी धम्मदेसनांद्वारे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्मितीसाठी धम्म प्रचार-प्रसाराच्या कार्याला वाहून घेतलेले भिक्खू करूणानंद थेरो यांचा महाथेरो समारंभ आणि कठीण चिवरदान धम्मसोहळा रविवारी (१९ ऑक्टोबर) रोजी नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती या समारंभाचे निमंत्रक आणि बीडच्या नालंदा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिलाच धम्म समारंभ असून या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातून १५ ते २० हजार उपासक-उपासिका उपस्थित राहतील, असेही प्रा. रोडे म्हणाले.

भिक्खू करूणानंद थेरो यांच्या भिक्खू जीवनातील विसाव्या वर्षावासाचा समारोप हा एक अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या वर्षावास अधिष्ठान संपन्नतेद्वारे भिक्खू करूणानंद थेरो हे ‘महाथेरो’ या ज्येष्ठतेला पात्र ठरणार असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून भिक्खू संघास दिल्या जाणाऱ्या कठीण चिवरदान दिले जाणार असून भिक्खू संघाकडून हे कठीण चिवरदान भिक्खू करूणानंद थेरो यांना प्रदान करण्यात येणार आहे.

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता या धम्मसोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. दर्शनशास्त्र व ३७ बोधिपाक्षीय धम्माचे गाढे अभ्यासक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भिक्खू धम्मसेवकजी महास्थवीर या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी भिक्खू शरणानंद महाथेरो, प्राचार्य भिक्खू डॉ. खेमधम्मो महाथेरो, भिक्खू बोधीपालो महाथेरो, भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू विशुधानंदबोधी महाथेरो, बेंगळुरूचे भिक्खू विनयरक्खित महाथेरो, भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या धम्मसोहळ्यात नागपूरचे भिक्खू प्रा. डॉ. चिंचाळ मेत्तानंद महाथेरो, भिक्खू प्रा.डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भिक्खू सुमनवन्नो महाथेरो, भिक्खू संघपाल महाथेरो आणि भिक्खू सत्यानंद महाथेरो हे मार्गदर्शन करणार असल्याचेही प्रा. रोडे यांनी सांगितले.

या धम्मसोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे, मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, स्मार्ट सिटीचे उपायुक्त रविंद्र जोगदंड, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, आंतरराष्ट्रीय गायक पावा, सा.बां. वि. चे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, दैनिक सम्राटचे संपादक कुणाल कांबळे आणि निवृत्त कार्यकारी अभियंता अशोक येरेकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या धम्मसोहळ्यात १०० थाई चिवर सेट भिक्खू संघाला दान करण्यात येणार आहेत. सायंकाळी ७.३० वाजता प्रा. संजय मोहोड आणि संचाकडून धम्मपदावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रम व गीत भीमायन ही संगीत मैफल होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून १०० हून अधिक भिक्खूही उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती प्रा. रोडे यांनी दिली. यावेळी भिक्खू करूणानंद थेरो यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाची रुपरेषा अशीः रविवारी सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहण व महामानवास अभिवादन, सकाळी ९.३० वाजता परित्राण पाठ व मंगलमैत्री पूजा, सकाळी १०.३० वाजता भिक्खू संघ आणि उपस्थितांना भोजनदान, दुपारी १२ वाजता कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ, दुपारी १२.३० वाजता त्रिशरण पंचशील प्रदान विधी, दुपारी १ वाजता भिक्खू संघ व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, दुपारी १.३० वाजता प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, दुपारी २ वाजता धम्मदेसना, सायंकाळी ६ वाजता संघदान व कठीण चिवरदान विधी आणि सायंकाळी ६.३० वाजता महाथेरो जाहीर विधान घोषणा अशी या धम्मसोहळ्यातील कार्यक्रमांची रुपरेषा आहे.

संबंधित पोस्ट

किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत धानखरेदीदार संस्थांमार्फत 46 खरेदी केंद्रावर धानाची (भाताची) खरेदी करता येणार

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील #राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाफ्राबादच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही     -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन 

जिल्ह्यातील अनेकांनी भिकन रोजेकर यांचा आदर्श घ्यावा: आमदार नारायण कुचे

महाड क्रांतीभुमीत भिमसृष्टी उभारण्यात यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  *चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापनदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले विनम्र अभिवादन*