vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात..

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात..

मुंबई, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -3 या पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी आता सुधारित जाहिरातीनुसार पदभरती होणार आहे. त्यानुसार इच्छुकांना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी दिली आहे.

राज्य शासन निर्णय दि. २७ फेब्रुवारी २०२४ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (SEBC) प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पदसंख्या वाढवून नव्याने सुधारित आरक्षण संरचना जाहीर करण्यात आली आहे. सुधारित जाहिरातीत काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गातील जागा उपलब्ध झाल्याने इच्छुक उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुकांनी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तथापि, कोणी नव्याने अर्ज केला, तर पूर्वीचा अर्ज बाद होऊन नवीन अर्जच ग्राह्य धरला जाईल. अर्ज व सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in/b/recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज ठाणे स्टेशन येथे गिरणी कामगार संयुक्त लढा समिती वतीने ठाण्यात “स्मरण मोर्चा..

vishwatmaklokswamivarta

महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन”नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा  – विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

vishwatmaklokswamivarta

मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई या कार्यालयात 131 व्या डाक अदालतीचे आयोजन

तारळी प्रकल्पांतर्गत माण वाढीव कालव्याच्या क्षेत्रामध्येकलम १४४ जमावबंदी आदेश लागू