vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रपतींच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा

राष्ट्रपतींच्या दिवाळीनिमित्त शुभेच्छा…

नवी दिल्ली प्रतिनिधी-भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या, “दिवाळी या पवित्र सणानिमित्त मी भारतात आणि जगभरातील सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देते व सद्भावना व्यक्त करते.

भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक असलेली दिवाळी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते. हा सण अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या या सणातून परस्पर प्रेम व बंधुत्वाचा संदेश मिळतो. या दिवशी श्रद्धाळू लोक संपत्ती व समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा करतात.

आनंदाचा हा सण आत्मचिंतन आणि आत्मविकासाचीही संधी आहे. तसेच, वंचित आणि गरजू लोकांना मदत करून त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचीही ही वेळ आहे.

मी सर्वांना विनंती करते की दिवाळी साजरी करताना सुरक्षितता, जबाबदारी आणि पर्यावरणपूरकता लक्षात घ्यावी. ही दिवाळी सर्वांना आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.”

00000

संबंधित पोस्ट

माध्यमिक; उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दक्षता समिती बैठक कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतातील एक सुवर्ण पर्व संपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

बँक ऑफ महाराष्ट्रच्या लीज व्यवहारातील संभाव्य अनियमिततेबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी – खासदार डॉ. कल्याण काळे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती …