vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

परभणी विभागासाठी नवीन सी-बँड रडार मंजूर- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी ‘मिशन मौसम’ योजेनेंतर्गत परभणी विभागात नवीन सी-बँड रडार बसविण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मंजूरी दिली असल्याचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे मराठवाड्यात हवामान अंदाजासाठी अत्याधुनिक डॉपलर वेदर रडार बसविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांनी पाठविलेल्या पत्रात पुढे नमूद केले आहे की, सोलापूर येथे आधीपासून कार्यरत असलेला २५० कि.मी. परिघाचा डॉपलर रडार सध्या परभणी आणि नांदेड परिसरातील हवामान निरीक्षणासाठी वापरला जात आहे. तसेच ‘मिशन मौसम’ योजनेंतर्गत परभणी भागात आणखी एक नवीन सी-बँड रडार बसविण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असून शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाची अचूक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम अत्यंत आवश्यक होता. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता हवामान अंदाजासाठी आपली क्षमता अधिक बळकट होईल, असा विश्वास राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

म्हैसमळ टेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे सी-बँड प्रकारचा २५० कि.मी. परिघाचा रडार

केंद्र सरकारकडे परभणी येथे हवामान निरीक्षणासाठी डॉपलर रडार बसविण्याची मागणी केली होती. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याने म्हैसमळ टेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे सी-बँड प्रकारचा २५० कि.मी. परिघाचा रडार बसविण्याचे काम सुरू आहे. या केंद्रामुळे मराठवाडा विभागातील हवामान निरीक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील शेती, पीक संरक्षण, हवामान पूर्वसूचना व आपत्ती व्यवस्थापनाला मोठा हातभार लागणार असल्याने राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा स्पर्धेतीलयशस्वी कार्यालयांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

न्याय न मिळाल्यास संसद भवन येथे आत्मदहन करणार – मंगल सुंदरदास बैष्णव  बैरागी

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.ओला,उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन