vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार-(MahaVISTAAR-AI’) मोबाईल अपचा वापर करावे

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार-(MahaVISTAAR-AI’) मोबाईल अपचा वापर करावे

                    अमरावती, प्रतिनिधी: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महाविस्तार (MahaVISTAAR-AI)’ हे आधुनिक मोबाईल अॅप विकसित केले असून, शेतकऱ्यांना डिजिटल सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हे अॅप अत्यंत उपयुक्त शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती व विकासासंदर्भात तांत्रिक सल्ला, हवामान अंदाज आदी बाबतची माहिती या ॲपव्दारे सुलभरित्या उपलब्ध होते. यानुषंगाने शेतकरी बंधुनी महाविस्तार (Mahavistaar AI’) मोबाईल ॲपचा वापर करावे. असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या अपद्वारे पिकांसंबंधी तांत्रिक सल्ला, हवामानाचा अचूक अंदाज, मृदा आरोग्यपत्रिका, खतमात्रा गणक, किड व रोग ओळख व त्यांचे व्यवस्थापन, शेती मालाचे बाजारभाव तसेच विविध कृषी शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. स्थानिक शेतीविषयक माहितीही या अपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

                        महाडीबीटी प्लॅटफॉर्मला महाविस्तार अॅपशी जोडण्यात आले असून भविष्यात कृषी विभागाच्या सर्व सेवा व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना हे एकच अॅप वापरावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे मोबाईल अॅप डाउनलोड करून वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे कृषी विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.

अॅपमधील विविध सेवा, सुविधा, चॅटबॉटचा वापर वाढावा आणि ‘महाविस्तार’ अॅपचा विस्तार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचावा यासाठी ‘महाविस्तार’ मोबाईल ॲप डाऊनलोड करुन अधिकाधिक शेतकऱ्यांनी वापर करावे. असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

शाळा प्रवेशोत्सव २०२५-२६ ठाणे जिल्ह्यात जल्लोषात साजरा होणार मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नियोजन पूर्ण..

vishwatmaklokswamivarta

अभिप्राय कक्षामुळे पारदर्शक प्रशासनाची नवी दिशा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा राज्यस्तरीय सन्मानमहाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त सन्मान

ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

सातारा जिल्हा पोलीस क्रेडिट को-ऑप. सोसायटीतर्फे भव्य विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा* 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta