vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे आयोजन

नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे आयोजन…

मुंबई, प्रतिनिधी: केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू केले आहे. या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन 19 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, खासदार अरविंद सावंत उपस्थित असणार आहेत. तसेच मुख्य सचिव राजेश कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला उपस्थित राहतील. प्रदर्शन 19 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान खुले असणार आहे.

प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित न्याय सहाय्यक शाखा, कारागृहे, जिल्हा न्यायालय, अभियोग संचालनालय आदींचे 14 स्टॉल्स असणार आहेत.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट ,पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, हवामान खात्या चा अंदाज..

नव्या मुंबईत विठुमाऊलीच्या नामगजरासह स्वच्छता दिंडी सोहळ्यात स्वच्छता व पावसाळी पाण्याच्या संग्रहण संदेशाचा जागर…

पर्यटन सुरक्षा दल उपक्रमाचा विस्तार करणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथे कुणबी प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वपूर्ण जिल्हानिहाय आढावा बैठक संपन्न…

नाशिक जिल्ह्यात खळबळजनक  धक्कादायक!बातमी- गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, आरोपी अटक

vishwatmaklokswamivarta

मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या-आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम 23 एप्रिलला