vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट ,पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, हवामान खात्या चा अंदाज..

मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट ,पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, हवामान खात्या चा अंदाज…

 

मुंबई प्रतिनिधी –

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोकणपट्टीवर पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात 18 व 19 जून रोजी तीव्र पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता आहे.आज मुंबईसह संपूर्ण कोकणपट्टीवर पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. आज( 18 जून) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सातारा व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचे यलो अलर्ट आहेत.

हवामान विभागाचा अंदाज काय ?

दक्षिण व मध्य भारताचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला असून आज संपूर्ण गुजरात राजस्थानचा काही भाग , मध्य प्रदेश,संपूर्ण छत्तीसगड, झारखंड ,उत्तर प्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. पुढील 24 तासात मुंबईसह उत्तर कोकण किनाऱ्यापासून पूर्वतर आणि पूर्वेकडील समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आहे .त्यामुळे मुंबई ठाणे येथे 70 ते 130 मीमी पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .प्रादेशिक हवामान केंद्रानुसार मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे .यावेळी 40 ते 50 किमी प्रति वेगाने वारे वाहण्याचे शक्यता आहे .पुढील 5 दिवस कुठल्या जिल्ह्याला कोणता अलर्ट ?

18 जूनःऑरेंज अलर्ट : पालघर ठाणे रायगड रत्नागिरी, पुणे व सातारा घाट परिसर

यलो अलर्ट : मुंबई,सिंधुदुर्ग,कोल्हापूर घाट माथा,नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नंदुरबार ,धुळे, जळगाव, बुलढाणा,वाशिम, अकोला ,अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया, गडचिरोली उर्वरित भागात पावसाचा अलर्ट नाही.मात्र हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे.

उद्या 19 जून

ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा घाटमाथ्यावर पावसाची शक्यता

यलो अलर्ट : छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी, हिंगोली ,नांदेड,व संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट

ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा घाटमाथ्यावर पावसाची शक्यता

20 जून :-यलो अलर्ट :संपूर्ण विदर्भासह हिंगोली ,परभणी, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता आहे .21 जून : संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट .ठाणे, रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे व सातारा घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे .

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन,सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

जिल्ह्यातील लघु सिंचन योजनांची सातवी तसेच जलसाठ्याची दुसरी प्रगणना वेळेत पुर्ण करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता मतदारांना 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर..

विशेष लेख -:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत,उत्सवअभिजातमराठीचा शासकीय प्रयोजनात मराठी

vishwatmaklokswamivarta