vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवे शैक्षणिक धोरण: शिक्षकांसाठी संधी व आव्हाने’ या विषयावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात संपन्न

‘नवे शैक्षणिक धोरण: शिक्षकांसाठी संधी व आव्हाने’ या विषयावर नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मार्गदर्शनपर कार्यशाळा उत्साहात संपन्न

     नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: शिक्षकांसाठी संधी व आव्हाने’ या विषयावर विशेष व्याख्यानसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या व माध्यमांच्या शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून चेंबूर येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉ.श्री.चंद्रशेखर चक्रदेव उपस्थित होते. त्यांनी आपल्या व्याख्यानातून नवीन शैक्षणिक धोरणाची (NEP) उद्दिष्टे स्पष्ट करतानाच यामुळे शिक्षकांसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या काळात शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे किती गरजेचे आहे हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले.

   या कार्यक्रमात ‘प्रथम’ संस्थेच्या श्रीम. फरीदा लांबे यांनीदेखील ऑनलाईन उपस्थित राहून शिक्षकांशी थेट सुसंवाद साधला. त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि विद्यार्थी घडवताना प्रत्यक्ष येणाऱ्या व्यावहारिक अडचणींवरही चर्चा केली.

    हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात आला होता. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे साहेब यांनी उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमाची सांगता करताना आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देऊन त्यांचे सातत्याने मूल्यमापन होण्याची गरज विशद केली. त्यादृष्टीने शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करणे, शिक्षकांची कौशल्ये वाढविणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक युगातील आव्हानांसाठी तयार करणे हे या नवे शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे हे त्यांनी स्पष्ट केले.

      या कार्यशाळेस नवी मुंबईतील प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील सर्व व्यवस्थापन व माध्यमांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. या व्याख्यानाचा लाभ उपस्थित बहुसंख्य शिक्षकांनी घेतला. या कार्यशाळा आयोजनासाठी शिक्षणाधिकारी अशोक कडुस, सहाय्यक आयुक्त श्रीम.दिपाली दिवेकर, सर्व केंद्र समन्वयक यांचे योगदान लाभले.

00000

संबंधित पोस्ट

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती-देवून सहकार्य करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव

समाजसेवेच्या आदर्शांचा गौरव – अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रम-समाजसेवेच्या आदर्शांची आठवण, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे 

नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी  संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल)आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा  –जिल्हाधिकारी किशन जावळे प्रशासन गाव की ओर सुशासन सप्ताह जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta