vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य लॉटरीच्या ऑक्टोबर महिन्यातील-मासिक, साप्ताहीक सोडतीचा निकाल जाहीर

राज्य लॉटरीच्या ऑक्टोबर महिन्यातील-मासिक, साप्ताहीक सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. ऑक्टोबर २०२५ मध्ये महाराष्ट्र दसरा भव्यतम, महाराष्ट्र सहयाद्री, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दसरा विशेष, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र दसरा भव्यतम सोडतीमधून तिकीट क्रमांक DB-02 25597 रूपये ५०,००,०००/- चे बक्षिस अग्रवाल लॉटरी एजन्सी, धुळे यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास प्रथम क्रमांकाचे बक्षिस व १,००,०००/- ची २ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

  ८ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र सहयाद्री या मासिक सोडतीमधून MS2510-A-46601 या चिराग एंटरप्रायजेस, नाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.२१ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.

     २१ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी या मासिक सोडतीमधून TJ- 02/3920 या मातोश्री एन्टरप्रायजेस, खामगांव व TJ- 07/9968 न्यु जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रु.५ लाखाची प्रथम क्रमांकाची दोन बक्षिसे जाहीर झाली आहेत.

      २२ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतीमधून GJ- 01/1585 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहिर झाले आहे. तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रू. ८ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ६ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

     याशिवाय ऑक्टोबर-२०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १७३८३ तिकीटांना रु. १,३९,०५,५५०/- व साप्ताहिक सोडतीतून ५८०६९ तिकीटांना रू. १,९२,५२,१००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.     सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

मुंबईतील कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार-मुख्यमंत्री फडणवीस· आयआयएमयूएन आयोजित ‘युथ कनेक्ट’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

1 मे पासून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळलेल्या 21 व्यावसायिकांकडून 1 लक्ष 5 हजार दंडवसूली व 103 किलो प्लास्टिक साठा जप्त

श्रीम.विजया चामे यांचे रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन होणार दक्षता समिती शिक्षण मंडळाचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिवस व पुरस्कार सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न,आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण