vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

भारतीय जनता पार्टी ने उमेदवारी दिल्यास प्रभाग क्र. 03 (अ) मध्ये प्रचंड ताकदीने निवडणूक लढवणार – अ‍ॅड.भगवान चांदोडे*

भारतीय जनता पार्टी ने उमेदवारी दिल्यास प्रभाग क्र. 03 (अ) मध्ये प्रचंड ताकदीने निवडणूक लढवणार – अ‍ॅड.भगवान चांदोडे*

 

जालना – प्रतिनिधी जालना महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 03 (अ) मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या प्रभागातून उच्च शिक्षित वकील व समाजसेवक ॲड भगवान चांदोडे यांनी भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. कायद्याचे सखोल ज्ञान आणि सामाजिक कार्याचा अनुभव या बळावर त्यांच्याकडून निवडणूक लढविण्याचे बोलले जात आहे.

अ‍ॅड.भगवान चांदोडे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण आणि लोकनेते माजी केंद्रीय मंत्री मा.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली व माजी आ. कैलासजी गोरंटयाल, भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास प्रभाग क्रमांक 03 (अ) मध्ये पक्षाचा झेंडा बुलंद ठेवत जनतेच्या आशीर्वादाने ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार आहे.” ते पुढे म्हणाले की, कायद्याचे आणि प्रशासनाचे अनुभव वापरून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर उपाय, सर्वांगीण विकास साधणे हा आपला मुख्य उद्देश आहे. शिक्षण, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, युवकांच्या प्रगतीसाठी योजनाचा प्रचार व प्रसार करू असे त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सार्वजनिक क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून त्यांचे योगदान आहे. या कार्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळेल असे वाटत आहे.पक्षाची उमेदवारी मिळताच विजय मिळवण्याचा आत्मविश्वास अ‍ॅड.भगवान चांदोडे यांनी व्यक्त केला आहे.*अ‍ॅड.भगवान चांदोडे*भाजपा इच्छुक उमेदवार,प्रभाग क्र.3 (अ)जालना महानगर पालिका निवडणूक 2025

मो.8657070101

संबंधित पोस्ट

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य

यशकथा-उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल; जिद्दीच्या बळावर उभारला स्वतःचा उद्योग

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिक सक्षम करणार – मंत्री आदिती तटकरे

हिंगोली जिल्ह्यातील 180 पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण- राज्यमंत्री मेघना बोर्डिकर

vishwatmaklokswamivarta

दर्पणकारांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी